AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा हा हिरवा ठिपका आहे कशाचा? सुरक्षेसाठी का इतका महत्त्वाचा?

Green Dot on Mobile Screen: मोबाईलच्या स्क्रीनवर अनेकदा आपल्याला एक ग्रीन डॉट, हिरवा ठिपका सारखा चमकत असतो. तो ब्लिंक करतो. त्यामागील सुरक्षेचे कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. काय आहे त्याचा अर्थ?

मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा हा हिरवा ठिपका आहे कशाचा? सुरक्षेसाठी का इतका महत्त्वाचा?
ग्रीन डॉटImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 01, 2026 | 3:23 PM
Share

Green Dot on Mobile Screen: मोबाईलच्या स्क्रीनवर कधी कधी हिरव्या रंगाचा एक ठिपका सारखा चमकताना तुम्हीही लक्षात घेतला असेल. ग्रीन डॉट सतत ब्लिंक करत असल्याने त्याकडे लक्ष जाते. फोनच्या स्क्रीनवर हा छोट्या रंगाचा डॉट सतत का चमकतो हे तुम्ही अगोदर समजून घ्यायला हवे. हा डॉट ब्लिंक होत असले तर याचा सरळ अर्थ असा आहे की, तुमच्या कॅमेऱ्याचा वापर कोणते तरी ॲप करत आहे. हे एक खासगी फीचर आहे. ते Android अथवा iPhone दोघांच्या युझर्ससाठी सुरक्षेसाठी देण्यात येते.

या फीचरची गरज काय?

हा ग्रीन डॉट तुम्हाला अलर्ट करतो की, तुमचे कोणतेतरी ॲप हा तुमच्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस करत आहे. त्यामुळे कॅमेरा चालू असल्याचे तुमच्या लक्षात येते. म्हणजे एक ॲप तुमची परवानगी न घेता तुमचा अथवा त्याच्या दृष्टी टप्प्यात येत असलेल्या वस्तूंचा फोटो आणि व्हिडिओ चोरून काढत असल्याचे त्याचा अर्थ आहे.

मायक्रोफोनसाठी सुद्धा असेच होते का?

काही फोनमध्ये हिरवा अथवा ऑरेंज डॉट हा मायक्रोफोनचा वापर दाखवण्यासाठी करण्यात येतो. जर मायक्रोफोन सुरू असेल तर फोनमध्ये केवळ नारंगी रंगाचा ठिपका दिसतो. ही सुविधा खासकरून iPhone मध्ये आहे. हिरवा डॉट कॅमेरा अथवा कॅमेरा आणि मायक्रोफोन दोन्ही ॲक्टिव्ह होण्याचे संकेत देतात.

तर राहा सावध

जर तुम्ही कॅमेरा वापरत नसाल आणि हिरवा डॉट दिसत असेल तर सावध राहा. याचा अर्थ तुमच्या बॅकग्राऊंडला कॅमेरा ॲक्सेस सुरू असतो. तेव्हा तुम्ही अशा ॲपचे ॲक्सेस चेक करा आणि तसं काही आढळलं तर लागलीच त्याची परवानगी बंद करा.

अगोदर करा हे काम

फोनच्या Settings मध्ये जाऊन Camera आणि Microphone permissions कंट्रोल करू शकता. ज्या ॲप्सवर तुमचा विश्वास नाही, त्यांची परवानगी बंद करा. त्यामुळे तुमचे खासगीपण जपले जाईल आणि कोणतेही ॲप तुमच्या परवानगीशिवाय कॅमेरा आणि मायक्रोफोनचा वापर करू शकणार नाही.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...