24 तासांनंतर व्हॉट्स अ‍ॅप मेसेज आपोआप गायब होणार; जाणून घ्या नवीन फिचर

या नवीन फिचरसह व्हॉट्स अ‍ॅप आपल्या प्रतिस्पर्धी अ‍ॅप्सना टक्कर देणार आहे. याच दृष्टीकोनातून व्हॉट्स अ‍ॅपने युजर्सना नवनवीन पर्याय देऊ केले आहेत. (WhatsApp message will disappear automatically after 24 hours; know about new features)

24 तासांनंतर व्हॉट्स अ‍ॅप मेसेज आपोआप गायब होणार; जाणून घ्या नवीन फिचर
24 तासांनंतर व्हॉट्स अ‍ॅप मेसेज आपोआप गायब होणार
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 8:16 AM

नवी दिल्ली : अधूनमधून हटके फिचर्स लॉन्च करणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅपने आता आणखी एक नवीन फिचर समाविष्ट केले आहे. फेसबुकचा मालकी हक्क असलेल्या या इस्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर आता 24 तासांत मेसेज आपोआप डिलीट होणार आहेत. नवीन फिचर अ‍ॅण्ड्रॉईड(Android), आयओएस(IOS) तसेच वेब(Web)वरही काम करणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर नवनवीन मेसेजेस, तसेच विविध ग्रुप्सवरील मेसेजचा मोठा खच साचतो, मग हे अनावश्यक मेसेज डिलीट करण्यावर आपला बराच वेळ वाया जातो. नव्या फिचरमुळे व्हॉट्स अ‍ॅप युजर्सचा वेळ वाचणार आहे. (WhatsApp message will disappear automatically after 24 hours; know about new features)

प्रतिस्पर्धी अॅपना देणार टक्कर

व्हॉट्स अ‍ॅपने गेल्या वर्षी सर्वात लोकप्रिय असे डिसअ‍ॅपेअरिंग मेसेज फिचर लॉन्च केले होते. यात आपले अनावश्यक मेसेज सात दिवसांत गायब करण्याची सुविधा देण्यात आली होती. आता वृत्त आहे की सात दिवसांत मेसेज गायब होण्याचा कालावधी 24 तासांवर आणण्यावर व्हॉट्स अ‍ॅपकडून काम केले जात आहे. या नवीन फिचरसह व्हॉट्स अ‍ॅप आपल्या प्रतिस्पर्धी अ‍ॅप्सना टक्कर देणार आहे. याच दृष्टीकोनातून व्हॉट्स अ‍ॅपने युजर्सना नवनवीन पर्याय देऊ केले आहेत.

इनेबल आणि डिसेबल पर्याय उपलब्ध

WABetaInfo वेबसाइटच्या वृत्तानुसार व्हॉट्सअॅप आधीपासून सुरू असलेल्या 7 दिवसात आपोआप मॅसेज गायब होणारा पर्याय बंद करणार नाही, तर यातच युजर्सला नवीन पर्याय उपलब्ध करुन देईल. आपण 7 दिवसाचा किंवा 24 तासांचा पर्याय निवडू शकता. म्हणजे वापरकर्त्यांकडे दोन्ही पर्याय असतील. WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये 24 तासात मॅसेज गायब करण्याचे इनेबल आणि डिसेबल असे दोन पर्याय असतील.

फोटोही आपोआप होणार गायब

यापूर्वी, व्हॉट्सअॅपने केवळ ग्रुप अॅडमिनला डिसअपेयरिंग मॅसेजसचे नियंत्रण दिले होते. मात्र आता ग्रुपमधील सर्व सदस्यांना मॅसेज सेटिंग बदलण्याचा अधिकार देखील देण्यात आला आहे. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्हीमध्ये फोटो आपोआप गायब होण्यासाठी व्हॉट्सअॅप चाचणी घेत आहे.

व्हॉईस नोटवर प्लेबॅक स्पीड

व्हॉट्सअॅप (WhatsApp) युजर्ससाठी लवकरच नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये व्हॉईस नोटवर प्लेबॅक स्पीड (playback speed) बदलता येणार आहे. तथापि असे फिचर गेल्या महिन्यात स्पॉट केले गेले होते. WAbetaInfo नुसार अँड्रॉईडच्या बीटा चॅनलमध्ये तीन प्लेबॅक स्पीड अॅड करण्यात आले आहे, ज्यामध्ये 1x, 1.5x आणि 2x समाविष्ट आहे. (WhatsApp message will disappear automatically after 24 hours; know about new features)

इतर बातम्या

आपल्या कोविड-19 अहवालात लपलेलीय ही महत्वाची माहिती, जाणून घेतल्यास कळेल संक्रमण किती आहे धोकादायक

धक्कादायक! भावाच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेत्री शनाया कटवेला अटक, रस्त्यावर सापडले मृतदेहाचे तुकडे

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.