AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TikTok पुन्हा भारतात येणार? नवीन व्हर्जन M2 बद्दल जाणून घ्या

एकेकाळी भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली होती. पण आता अमेरिकेसाठी खास M2 नावाचा नवीन अ‍ॅप तयार होत आहे. त्यामुळे TikTok भारतात पुन्हा येणार का? याची उत्तरं जाणून घेण्यासाठी या लेखातील एकही मुद्दा चुकवू नका...

TikTok पुन्हा भारतात येणार? नवीन व्हर्जन M2 बद्दल जाणून घ्या
TikTokImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 11, 2025 | 2:54 PM
Share

डिजिटल जगतात एक मोठी बातमी चर्चेत आली आहे. TikTok चे पॅरेंट कंपनी ByteDance आता “TikTok M2” नावाचं नवीन व्हर्जन तयार करत आहे. हे नवीन अ‍ॅप अमेरिकेसाठी डिझाइन केलं जात आहे आणि 5 सप्टेंबरला Apple App Store वर लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे, यानंतर मूळ TikTok अ‍ॅप अ‍ॅप स्टोअरवरून हटवण्यात येणार आहे.

अमेरिकेसाठी वेगळं अ‍ॅप तयार

TikTok M2 हे अ‍ॅप अमेरिकी युजर्ससाठी खास बनवलं जात आहे. यामध्ये ByteDance ची भागीदारी फारच मर्यादित असेल आणि कंट्रोल एका अमेरिकी कंपनीकडे दिला जाणार आहे. यामागचं कारण म्हणजे अमेरिकेत TikTok वरील बंदीची शक्यता आणि डेटा सुरक्षेवरील चिंता.

अमेरिकन सरकारने TikTok ला 17 सप्टेंबरपर्यंत अमेरिकन व्यवसाय स्थानिक कंपनीकडे हस्तांतरित करण्याचं आदेश दिला आहे. आधी हे अ‍ॅप जानेवारीमध्ये बंद होणार होतं, मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे मुदत वाढवण्यात आली.

Apple च्या धोरणामुळे वेगळं अ‍ॅप

सामान्यतः कंपन्या विशेष देशांसाठी एकाच अ‍ॅपमध्ये वेगळी आवृत्ती (region-specific version) तयार करतात. पण Apple Store हे परवानगी देत नाही. त्यामुळे ByteDance ला TikTok M2 नावाने पूर्णपणे नवीन अ‍ॅप सादर करावं लागणार आहे. अमेरिका हा TikTok साठी अत्यंत महत्त्वाचा मार्केट आहे, जिथे 17 कोटीहून अधिक लोक TikTok वापरतात आणि त्यातील बहुसंख्य iPhone वापरकर्ते आहेत.

भारतात TikTok ची पुनरागमन शक्यता?

गेल्या काही वर्षांपूर्वी TikTok हे भारतातील सर्वात लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म होतं. मात्र, गलवान संघर्षानंतर भारत सरकारने TikTok सह अनेक चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली. तरीही आजही तरुणाईमध्ये TikTok ची पुनरागमन होणार का? यावर चर्चा सुरू असते. जर अमेरिकेत TikTok M2 या मॉडेलनं यश मिळालं, तर भारतातही अशीच रणनीती राबवून TikTok परतू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

TikTok M2 हे अमेरिकेसाठी एक नविन युजर-फ्रेंडली आणि डेटा-सुरक्षित पर्याय असू शकतो. भारतात TikTok परत येईल का यावर अजूनही अनिश्चितता आहे, पण ByteDance च्या हलचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अमेरिकेतील हा डिजिटल बदल जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पाडू शकतो.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.