Xiaomi चा दिवाळी धमाका : 1 रुपयात मोबाईल, Mi TV वरही मोठी सूट

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Sep 24, 2019 | 4:50 PM

Xiaomi ने धमाकेदार सेलची घोषणा केली आहे (Xiaomi Diwali Sale). शाओमीच्या या सेलचं नाव Diwali With Mi आहे. हा सेल 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत असेल. यामध्ये 1 रुपयाचा फ्लॅश सेलही असेल. यामध्ये तुम्ही Redmi K20, Mi Smart Band 4 सोबतच शाओमीचे अनेक प्रोडक्ट्स फक्त 1 रुपयांत खरेदी करु शकता

Xiaomi चा दिवाळी धमाका : 1 रुपयात मोबाईल, Mi TV वरही मोठी सूट

मुंबई : Xiaomi ने धमाकेदार सेलची घोषणा केली आहे (Xiaomi Diwali Sale). शाओमीच्या या सेलचं नाव Diwali With Mi आहे. हा सेल 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत असेल. यामध्ये 1 रुपयाचा फ्लॅश सेलही असेल. यामध्ये तुम्ही Redmi K20, Mi Smart Band 4 सोबतच शाओमीचे अनेक प्रोडक्ट्स फक्त 1 रुपयांत खरेदी करु शकता (Xiaomi Flash Sale). हा 1 रुपयांचा फ्लॅश सेल रोद सायंकाळी 4 वाजता असेल. शाओमीच्या या सेलमध्ये HDFC बँकेचं कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शनवर 10 टक्के सूटही मिळेल. शाओमीचा हा सेल Mi.com वर असेल (Xiaomi 1 Rs Sale ).

4,999 रुपयांमध्ये Redmi 7A

सेलमध्ये Redmi 7A स्मार्टफोन हा 4,999 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये HDFC बँकेच्या कार्डवर 10 टक्के सूटही मिळेल. म्हणजेच तुम्हाला 400 रुपयांची सूट मिळेल. फ्लिपकार्टवरही या फोनची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर अॅमेजॉनने अद्याप आपली सेल प्राईज उघड केलेली नाही.

क्रेजी डील्समध्ये 80 टक्क्यांपर्यंतची सूट

या सेलमध्ये Mi Pocket स्पीकर, Mi Travel बॅकपॅकसोबत इतर अनेक वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. क्रेजी डील्स, सेल प्रत्येक दिवशी सकाळी 10 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता असेल. त्याशिवाय, Mi ईअरफोन्सवर 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. तर मोबाईल अक्सेसरीजवर 49 रुपयांपासून मिळेल.

Redmi Note 7 Pro वर ऑफर

शाओमीचा Redmi Note 7 Pro स्मार्टफोन 2,000 रुपयांच्या प्राइस कटसोबत सेलमध्ये असेल. याची किंमत 11,999 रुपये असेल. फ्लिपकार्टवरही या फोनची किंमत इतकीच ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय, फ्लिपकार्ट जुन्या मोबाईलच्या बदल्यात 1,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंटही देईल.

10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Redmi Y3

शाओमीच्या या सेलमध्ये Redmi Y3 च्या किमतीतही मोठी सूट देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. हा स्मार्टफोन 3 जीबी आणि 4 जीबी ऑप्शन प्राइस कटसोबत Mi.com वर उपलब्ध असेल. तर सेलदरम्यान Redmi K20 Pro स्मार्टफोन 24,999 रुपयांमध्ये तर Redmi Note 7S स्मार्टफोन 8,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. Mi TV ही स्वस्तात मिळणार

या सेलमध्ये Mi TV च्या जुन्या किमतीतही तफावत जाणवेल. यामध्ये 32 इंचाचा Mi LED TV 4A Pro, 32 इंचाचा Mi LED TV 4C Pro, 43 इंचाचा Mi LED TV 4A Pro आणि 55 इंचाचा Mi LED TV 4X Pro उपलब्ध असेल. 10,000 mAh असलेला Mi Power Bank 2i आणि Mi Band 3 वरही सूट मिळेल.

संबंधित बातम्या :

गुगल प्ले स्टोअरवरुन ‘हे’ सहा अॅप हटवले, तुम्हीही तातडीने डिलिट करा

Airtel चा नवा प्लान, दररोज 2GB डेटासोबतच 4 लाखांचा जीवन विमा

WhatsApp मध्ये नवं फीचर, स्टेटस अपडेट करणाऱ्यांसाठी खुशखबर

Xiaomi चे 4 स्मार्ट टीव्ही लाँच, पाहा किंमत आणि फिचर्स

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI