AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Xiaomi Mi 11 Lite चा पहिला सेल सुरु

हा फोन 28 जूनपासून (आजपासून) ओपन सेलमध्ये खरेदी करता येईल. परंतु येथे आणखी एक ऑफर आहे जी आपल्याला आकर्षित करू शकते

3000 रुपयांच्या डिस्काउंटसह Xiaomi Mi 11 Lite चा पहिला सेल सुरु
Xiaomi Mi 11 Lite 4G
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 11:08 PM
Share

मुंबई : शाओमी Mi 11 लाइट (Xiaomi MI 11 Lite) हा स्मार्टफोन गेल्या आठवड्याच्या सुरूवातीला लाँच केला होता. कंपनीने भारतात एमआय 11 मालिकेचा विस्तार केला आहे. एमआय 11 लाइट आता प्री-ऑर्डरसाठी भारतात उपलब्ध आहे. तसेच हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्लिपकार्टवर बर्‍याच ऑफर्स मिळत आहेत. शाओमी Mi 11 लाइट 4 जी भारतात Mi वॉच रिवॉव्ह अॅक्टिव्हसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन Mi 11 सिरीजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. (Xiaomi Mi 11 lite first sale live on flipkart, buy this phone with bumper discount)

हा फोन 28 जूनपासून (आजपासून) ओपन सेलमध्ये खरेदी करता येईल. परंतु येथे आणखी एक ऑफर आहे जी आपल्याला आकर्षित करू शकते आणि ती म्हणजे 3000 रुपयांची ची सूट. हा फोन 21999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये आपल्याला 6 GB जीबी रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेल खरेदी करता येईल. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलसाठी तुम्हाला 23,999 रुपये मोजावे लागतील.

डिस्काउंट कसा मिळवता येईल?

हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 1500 रुपयांची सूट मिळू शकते. त्याच वेळी क्रेडिट कार्ड आणि नॉन ईएमआय व्यवहारांवर तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळू शकते. एचडीएफसी बँक ईएमआय व्यवहारांवर तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळू शकते. यात तुम्हाला एकूण 3000 रुपयांची सूट मिळवता येईल. हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल, ज्यामध्ये टस्कनी कोरल, जॅझ ब्लू आणि विनी ब्लॅक या रंगांचा समावेश आहे.

फोनमधील फीचर्स

Mi 11 लाइट मध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रीफ्रेश रेट, एचडीआर 10+ सपोर्ट, उत्कृष्ट कॉन्ट्रास्ट आणि रंगांसाठी 10-बिट पॅनेलसह येतो. हा स्मार्टफोन 6.8 मिमी जाड आणि 157 ग्रॅम वजनाचा आहे. हा फोन एका ग्लास रियर पॅनेलसह येतो आणि भारतात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. शाओमीने नुकतंच देशात 4G व्हेरियंट लॉन्च केलं आहे, परंतु भविष्यात त्याचे 5 जी मॉडेल येऊ शकेल असे संकेत कंपनीने दिले आहेत.

फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याने सुसज्ज आहे.

शाओमीने 23 डायरेक्टर मोडसह अनेक फोटोग्राफी स्पेशल फीचर्स फोनमध्ये समाविष्ट केले आहेत. एमआय 11 लाइटमध्ये 4,250 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 33W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये साइड-माऊंट फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील आहे. फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आलेला नाही, मात्र Xiaomi डिव्हाइससोबत टाइप-सी 3.5 मिमी हेडफोन अडॅप्टर देत आहे.

इतर बातम्या

WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा

भारतात Nokia चा पहिला 5G फोन लवकरच लाँच होणार, ‘या’ स्मार्टफोन्सची एंट्री

64MP कॅमेरा, 8GB रॅम, नव्या Mi 11 Lite वर 3000 रुपयांचा डिस्काउंट

(Xiaomi Mi 11 lite first sale live on flipkart, buy this phone with bumper discount)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.