VIDEO : हौशी पर्यटक व्हिडिओ काढत होते, इतक्यात सिंहाने जे केले ते पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक प्राणीसंग्रहालयात पिंजऱ्यात ठेवलेल्या सिंहाला पाहण्यासाठी गेले आहेत. यावेळी ते सिंहाबरोबर सेल्फी काढण्याचाही प्रयत्न करतात.

VIDEO : हौशी पर्यटक व्हिडिओ काढत होते, इतक्यात सिंहाने जे केले ते पाहून पोट धरुन हसाल
सिंहाचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलImage Credit source: social
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 8:59 PM

लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच प्रत्यक्ष जंगली प्राणी पाहण्याची खूप उत्सुकता असते. यासाठी लोक प्राणिसंग्रहालयाला अवश्य बेट देतात. भेटीदरम्यान फोटो, व्हिडिओ काढणे हा तर अगदी ठरलेला कार्यक्रम. असेच हौशी पर्यटक प्राणिसंग्रहालयात सिंह पाहण्यासाठी गेले. सिंहाला पाहून त्याचे फोटो, व्हिडिओ काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही. पर्यटक सिंहासोबत सेल्फी काढत असतानाच अचानक सिंहाने जे केले ते पाहून तुम्ही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक प्राणीसंग्रहालयात पिंजऱ्यात ठेवलेल्या सिंहाला पाहण्यासाठी गेले आहेत. यावेळी ते सिंहाबरोबर सेल्फी काढण्याचाही प्रयत्न करतात.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओत काय आहे?

व्हिडिओ पाहून जंगलच्या राजाचे काही वेगळेच सुरु असल्याचे दिसते. व्हिडिओत एक माणूस पिंजऱ्याजवळ पोहचताच सिंह मागे वळतो आणि व्हिडिओ काढत असलेल्या व्यक्तीच्या दिशेने येतो. तो इतक्यावरच थांबत नाही, त्यानंतर सिंह जे करतो ते पाहून व्हिडिओ काढणाऱ्याचा मूडच बिघडून जातो.

व्हिडिओवर युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया

सिंहाचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्हीही कदाचित हेच म्हणाल की, सिंहाने या व्यक्तीचा भयंकर अपमान केला.

सेल्फीदरम्यान सिंहाच्या विचित्र कृत्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. एक मजेशीर कॅप्शन देत युजरने लिहिले की, ‘आता सिंहही सेल्फीमुळे हैराण झाला आहे.’ दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले की, भाऊ… सिंहाने व्यक्तीचा अप्रतिम अपमान केला आहे.

अन्य एका युजरने लिहिले आहे की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला हसू आवरता येत नाही. याशिवाय बहुतांश युजर्सनी इमोटिकॉन्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकूणच जंगलाच्या राजाचा हा व्हिडिओ लोकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.

आतापर्यंत 21 हजारांहून अधिक व्ह्यूज

ट्विटरवर शेअर झालेली 15 सेकंदांची ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 21 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. तसेच अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.