AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral: दीवच्या बीचवर पॅरासेलिंग करणं जोडप्याला भोवलं, कधीही न विसरता येणारा अपघात

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं पॅरासेलिंग राईडचा आनंद लुटण्यासाठी निघालं होतं, यादरम्यान त्यांच्यासोबत झालेल्या अपघातामुळे त्यांना एका भीषण अपघाताचा सामना करावा लागला

Viral: दीवच्या बीचवर पॅरासेलिंग करणं जोडप्याला भोवलं, कधीही न विसरता येणारा अपघात
पॅरासेलिंग करणं जोडप्याच्या जीवावर
| Edited By: VN | Updated on: Nov 20, 2021 | 5:43 PM
Share

आजच्या काळात अॅडव्हेंचर कुणाला आवडत नाही? जेव्हा लोक फिरायला जातात, तेव्हा ते काहीतरी अॅडव्हेंचर्स करतातच, पण कधीकधी साहसाची क्रेझ काही लोकांसाठी मृत्यूचे कारणही बनते. असाच एक व्हिडिओ अलीकडच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका जोडप्याने साहस अनुभवण्यासाठी पॅरासेलिंग करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांच्यासोबत असं काही घडले की हे सगळं अॅडव्हेंचर त्यांच्या जीवावर आलं. (Accident Video of parasailing Viral video of couple enjoying parasailing in diu suddenly rope snaps from boat both fall in sea)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं पॅरासेलिंग राईडचा आनंद लुटण्यासाठी निघालं होतं, यादरम्यान त्यांच्यासोबत झालेल्या अपघातामुळे त्यांना एका भीषण अपघाताचा सामना करावा लागला, जो ते कधीही विसरणार नाहीत. हे जोडपं आयुष्यभर हा अपघात विसरू शकणार नाहीत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोग्य कर्मचारी अजित काथड आणि त्यांची पत्नी सरला रविवारी सकाळी पॅरासेलिंगसाठी दीवच्या नागोवा बीचवर पोहोचले होते. समुद्रात धावणाऱ्या मोटार बोटीतून पॅराशूटवर दोघेही आकाशात उड्डाण करत पॅरासेलिंगचा आनंद घेत होते. त्यानंतर अचानक मोटार बोटीला बांधलेली दोरी तुटली आणि दोघेही समुद्रात पडले. पॅराशूटची दोरी तुटून दोघेही पाण्यात पडल्याचे त्यांना काही सेकंदही कळले नाही.

व्हिडीओ पाहा

@RahulDharecha नावाच्या अकाऊंटवरून हा धक्कादायक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही क्षणभर घाबरले असाल, लोक ही व्हिडिओ क्लिप एकमेकांसोबत शेअर करत आहेतच पण त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी पॅरासेलिंग सोडून दिले.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी क्षणभर घाबरलो.’ तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, नुकतेच मध्य प्रदेशातील खंडवा येथे हनुवंतिया बेटावर पॅराग्लायडिंगची दोरी तुटल्याने इव्हेंट कंपनीच्या 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही पाहा:

Video: घरात सगळे जमिनीवर झोपले होते, अचानक घोरपड घरात घुसली, आणि त्यानंतर…

Video: मुलाचं मुंडन आणि आई ढसाढसा रडली, भावूक झालेला आईचा व्हिडीओ 4 कोटी लोकांनी पाहिला!

 

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?