AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir | मेरी झोपडी में राम आएंगे… लता दीदींच्या आवाजातील गाणं तुफान व्हायरल, कसं झालं शक्य ?

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचा आज उद्घाटन सोहळा असून काही तासांतच प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार या निमित्ताने गाणी लिहित आणि गात आहेत. AI ने लता मंगेशकर यांच्या आवाजात 'राम भजन' तयार केलं आहे. बघता बघता हे भजन खूपच व्हायरल झालं आहे. ते ऐकून अनेक लोक खूपच खुश झाले आहेत.

Ram Mandir | मेरी झोपडी में राम आएंगे... लता दीदींच्या आवाजातील गाणं तुफान व्हायरल, कसं झालं शक्य ?
| Updated on: Jan 22, 2024 | 12:46 PM
Share

Ram Aayenge in Lata Mangeshkar Voice:  भारतीय सोशल मीडिया, विशेषत: इन्स्टाग्राम, हे एआय जनरेट केलेल्या ऑडिओ आणि गाण्यांसह एडिटेड व्हिडीओजनी भरलेलं आहे. हा ट्रेंड इतका लोकप्रिय आहे की त्यातून अनेक लोकप्रिय व्यक्तींचीही सुटका होत नाही. दररोज आपल्याला त्यातून नवे काही ‘रिलीज’ ऐकायला मिळतात, जे अनेकदा एआय टूल्स वापरून प्रसिद्ध व्यक्तींच्या आवाजात तयार आणि शेअर केले जातात. याशिवाय या जगातून निघून गेलेल्या कलाकारांच्या आवाजातील गाणी पुन्हा तयार करण्यासाठी लोकांनी AI चा वापर केला आहे.

गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही त्यांचा अवीट गोड आवाज आणि त्यांची गाणी लाखो रसिकांच्या स्मरणात आजही आहेत. अलीकडेच, सोशल मीडियावर एक मोहक क्लिप प्रसारित झाली , गानकोकिळा, दिवंगत गायिका, लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘राम आएंगे तो अंगना सजाऊंगी’ या गाण्याचे व्हायरल रिक्रिएशन दाखवण्यात आले होते. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या दरम्यानच रिलीज झाल्याने हे भजन आणि ती क्लिप खूप व्हायरल आली आहे.

अयोध्येतील राम मंदिराचा आज उद्घाटन सोहळा असून काही तासांतच प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार या निमित्ताने गाणी लिहित आणि गात आहेत. त्याच दरम्यान, लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन खूप व्हायरल होत आहे. AI ने लता मंगेशकर यांच्या आवाजात राम भजन सादर केले आहे. हे राम भजन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे भजन लोकांना प्रचंड आवंडल असून अप्रतिम अशीच दाद रसिक श्रोत्यांकडून मिळत आहेत.

सोशल मीडियावर झालं शेअर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x (पूर्वीचं ट्विटर) यावर हे भजन खूप व्हायरल होत असून अनेकांनी ते शेअर केलं आहे. हा व्हिडीओ पाहून आणि दिदींचा आवाज ऐकून अनेक लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘ प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर यापेक्षा चांगले काहीही नाही, मी मूळ गाणं कधी ऐकलं नाहीये, पण हे मात्र अगदी, पूर्ण ऐकलंय’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.

पण काहींना हे फारस आवडलं नाही. या गाण्यातील आवाज लता मंगेशकर यांच्याशी मिळता-जुळता असला तरी त्यात भाव नाहीत, गाण्यात ते भाव कमी जाणवतात अशी कमेंट एका युजरने केली. त्या (लता मंगेशकर) गाण्यात जीव ओतायच्या, असंही त्याने नमूद केलं. तर दुसऱ्या यूजरने लिहीलं की ‘हा एक चांगला प्रयत्न आहे पण दिदींच्या आवाजात जी जादू होती, ती (गाण्यात) यात नाही.’ एका युजरला तर हे गाणं खूपच आवडलं, मी हे (भजन) तासनतास ऐकू शकते असे त्याने लिहीले.

एकंदरच AI ने सादर केलेला हा प्रयत्न वेगळा ठरला असून त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दिदींचा आलाज ऐकून चाहते आनंदले आहेत.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.