एअरपोर्ट वर चेकिंग करताना सुटकेसमध्ये असं काही सापडलं की सगळेच Shock!
इथल्या चेकिंग गेटवर एक व्यक्ती सुटकेस घेऊन आली आणि सुटकेस मशीनमध्ये घुसताच मशीनने अलार्म वाजवला.

विमानतळ किंवा मेट्रोसारख्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सुरक्षा यंत्रणेला तडा जाऊ नये म्हणून तपास यंत्रणा बसवलेली असते. दरम्यान, अमेरिकन विमानतळावरून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. इथे तपासणी करताना एका सुटकेसमध्ये असं काही सापडलं की अधिकारी आश्चर्यचकित झाले. जेव्हा सुटकेस पाहून मशीनने गजर वाजवला तेव्हा हा सर्व प्रकार लक्षात आला.
ही घटना न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावरील आहे. इथल्या चेकिंग गेटवर एक व्यक्ती सुटकेस घेऊन आली आणि सुटकेस मशीनमध्ये घुसताच मशीनने अलार्म वाजवला.
अलार्म वाजल्यानंतर अधिकाऱ्यांनी एक्स-रे मशीनची तपासणी केली त्यात मांजर आढळून आले. बॅगेत मांजर पाहून अधिकाऱ्यांना विश्वासच बसत नव्हता की, ती जिवंत आहे. लगेच बॅग उघडली, त्यानंतर मांजराने ‘म्याव म्याव’ आवाज काढायला सुरुवात केली.
अधिकाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावलं. कर्मचाऱ्यांनी तातडीने सुटकेसच्या मालकाला फोन केला, तेव्हा खुद्द प्रवासीच आश्चर्यचकित झाला.
तो म्हणाला की मांजर त्याच्या बॅगेत कशी आली याची त्याला कल्पना नव्हती. मात्र, ही आपली मांजर आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर प्रवाशाच्या चौकशीदरम्यान ही मांजर अनावधानाने बॅगेत आल्याचे आढळून आले.

suitcase checking
रिपोर्ट्सनुसार, मालकाने सांगितले की तो प्रवासासाठी तयार होत होता त्यामुळे हे कसे आणि कधी घडले हे त्याला कळू शकले नाही. मांजर घरात आपल्याभोवती उड्या मारत होती, ती बॅगमध्ये जाऊन कधी बसली हे त्यालाही कळलं नाही.
