6 फुटाहून अधिक उंचीची आस, पठ्ठ्याने मोजले 55 लाख

6 फुटाहून अधिक उंचीची आस, पठ्ठ्याने मोजले 55 लाख

टेक्सासमध्ये राहणारा अल्फान्सो फ्लोर्स पाच फूट 11 इंच उंच होता, मात्र लहानपणापासूनच त्याला आणखी उंच होण्याची इच्छा होती. (Alfonso Flores Increase Height Surgery)

अनिश बेंद्रे

|

Jan 21, 2021 | 8:03 AM

मुंबई : सौंदर्याच्या परिभाषेत बसणारे वजन, उंची, रंग ‘नीटनेटके’ करुन घेण्याची आस बहुतांश जणांना असते. रंग उजळण्यासाठी चेहऱ्याला क्रीम फासणं असो किंवा वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन, अनेक जण याचा अवलंब करताना दिसतात. उंचीच्या बाबतीत मात्र ‘पी हळद नि हो गोरी’ असा प्रकार जमत नाही. परंतु अमेरिकेत राहणाऱ्या युवकाने आपली उंची चक्क दोन इंचांनी वाढवून घेतली. त्यासाठी त्याने थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 55 लाख रुपये मोजले. (Alfonso Flores Paid 55 Lakh To Increase His Height limb-lengthening surgery)

पाच फूट 11 इंचातही नाखुश

टेक्सासमध्ये राहणारा अल्फान्सो फ्लोर्स (Alfonso Flores) हा 28 वर्षीय तरुण बघायला गेलं तर तसा उंचापुरा. अल्फान्सोची उंची आहे पाच फूट 11 इंच. मात्र लहानपणापासूनच त्याला आणखी उंच होण्याची इच्छा होती. सहा फुटापेक्षा जास्त उंच होण्याच्या आसक्तीतून त्याने स्वतःची कॉस्मेटिक सर्जरी करुन घेतली. त्याच्या पायांची उंची वाढवण्यासाठी लिंब लेंथनिंग (limb-lengthening surgery) शस्त्रक्रिया करण्यात आली. आता अल्फान्सोची उंची 6 फूट 1 इंच झाली आहे.

लास वेगासमध्ये महागडी सर्जरी

अल्फान्सोने सर्जरी करुन घेण्याला त्याचे मित्र, कुटुंबीय यांचा विरोध होता. हार्वड विद्यापीठात शिक्षित ओर्थोपेडिक सर्जन डॉ. केविन देबीपार्षद यांनी ऑपरेशन केलं. लास वेगासमधील द लिंबप्लास्टएक्स इन्सिट्यूट (The LimbplastX Institute) मध्ये त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. अल्फान्सोचे बिफोर आणि आफ्टर फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ऑगस्ट महिन्यात सर्जरी झाल्यानंतर अल्फान्सोला उंची वाढवण्यात कशी मदत झाली, हे दाखवण्यात आलं आहे.

75 हजार डॉलरची शस्त्रक्रिया

डॉ. केविन देबीपार्षद यांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, फेमुर (मांडी) लेंथनिंग (femur-lengthening) प्रक्रियेसाठी किमान 75 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 55 लाख रुपये मोजावे लागतात. याची किंमत 84 हजार डॉलर्सपर्यंत वाढूही शकते. मांडी किंवा पोटरीची लांबी वाढवण्याची ही शस्त्रक्रिया आहे. (Alfonso Flores Paid 55 Lakh To Increase His Height limb-lengthening surgery)

हवेहवेची हाव सरेना…

“5’11 ही उत्तम उंची असल्याची मला कल्पना आहे. अनेक जणांना आपलीही इतकी उंची असावी, असं वाटत असतं. पण मला त्याहून जास्त उंच व्हायचं होतं” अशी प्रतिक्रिया अल्फान्सोने दिली. 55 लाख रुपये मोजून दोन इंच वाढवून अल्फान्सोला आपली अॅथलेटिक कौशल्या आणखी विकसित करायचे आहेत.

Posted by Limbplastx Institute for Limb Lengthening on Tuesday, 25 August 2020

संबंधित बातम्या :

विकृतपणाचा कळस! केकवर गृप्तांगाची डिझाईन, महिलेला अटक

(Alfonso Flores Paid 55 Lakh To Increase His Height limb-lengthening surgery)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें