Video | लॉकडाऊन संपल्यानंतर आनंद महिंद्रा काय करणार ? ‘हा’ व्हिडीओ अपलोड करत सांगितलं किती आनंद होणार

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक मजेदार ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटची सगळीकडे चर्चा होत आहे. (anand mahindra viral video corona virus lockdown)

prajwal dhage

|

Apr 16, 2021 | 12:01 AM

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे राज्यासह देशात अनेक प्रतिबंधात्मक निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे अनेकांना कंटाळवाणं वाटतं. राज्य सरकारने तर संचारबंदी लागू केल्यामुळे अनेकांनी नापसंतीसुद्धा व्यक्त केली होती. याच गोष्टीला घेऊन प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक मजेदार ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटची सगळीकडे चर्चा होत आहे. (Anand Mahindra share funny viral video and says that how he will celebrate once the Corona virus and lockdown is over)

आनंद महिंद्रा हे देशातील प्रसिद्ध उद्योजगांपैकी एक आहेत. एवढा सारा कामाचा व्याप असूनसुद्धा ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या मजेदार गोष्टी शेअर करत असतात. सध्या लॉकडाऊन आणि कोरोना प्रतिबंध यांना घेऊन त्यांनी एक मजेदार ट्विट केले आहे. त्यांनी एका कुत्र्याचा व्हिडीओ ट्विट केला असून लॉकडाऊन बंद झाल्यानंतर मी अशाच प्रकारे आनंदीत असेल असे त्यांनी म्हटलंय.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये एक कुत्रा दिसतोय. त्याचा मालक त्याला बाहेर फिरायला घेऊन गेलेला आहे. बाहेरची मोगळी हवा, बाहेरचं वातावरण पाहून तो अगदीच आनंदीत झाल्याचं दिसत आहे. हा कुत्रा हवेत उत्स्फूर्तपणे उड्या घेत असल्याचं दिसतंय. उंच हवेत उड्या घेत असल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नसल्याचं भासत आहे. हाच मजेदार व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर टाकल्यानंतर तो काही क्षणांत व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला काही क्षणात 40 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. कुत्र्याच्या या व्हिडीओला तब्बल 1500 लोकांनी लाईक केले आहे.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे प्रत्येकाच्या स्वतंत्र्यावर गदा आलेली आहे. अनेक निर्बंध आपल्याला पाळावे लागत आहेत. सध्या प्रत्येकालाच मोकळ्या श्वासाची आस लागलेली आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या कुत्र्याच्या स्वातंत्र्याची तुलना सगळेजण स्वत:च्या स्वातंत्र्याशी करत आहेत. कदाचित म्हणूनच हा व्हिडीओ जास्त व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Viral Video | व्हेल माशाची बोटीला टक्कर; माणूस थेट समुद्रात, पाहा थरारक व्हिडीओ

VIDEO | ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांना घाणेरडे मेसेज, महिलेकडून बॉसची चांगलीच धुलाई, व्हिडीओ व्हायरल

“सरकारने सर्वात आधी शालूच्या फोटोवरील कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा”

(Anand Mahindra share funny viral video and says that how he will celebrate once the Corona virus and lockdown is over)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें