“आरती कुंज बिहारी” गाण्याचं लोकांमध्ये प्रचंड वेड, हा व्हिडीओ पाहिलात का?
इंटरनेट जगतात सक्रिय असणाऱ्यांना हे चांगलंच ठाऊक असेल की, ट्रेंडचं फॅड असतं इंटरनेटवर. लोकांना इथे कधी काय आवडतं याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे.

सोशल मीडिया किती खोल आहे याची कोणालाही कल्पना नाही. इथे व्हिडिओंचा खजिना आहे, जो इतका मोठा ज्याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही. दररोज शेकडो व्हिडिओ त्या खजिन्यात समाविष्ट होत जातात. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, या व्हिडिओंचा हा खजिना जतन करण्याचं काम करतात. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यामुळे तुमचे खूप मनोरंजन होते. असाच काहीसा प्रकार हल्ली लोकांमध्येही चर्चेतआहे. जे पाहिल्यानंतर तुमचा दिवस चांगला जाईल.
इंटरनेट जगतात सक्रिय असणाऱ्यांना हे चांगलंच ठाऊक असेल की, ट्रेंडचं फॅड असतं इंटरनेटवर. लोकांना इथे कधी काय आवडतं याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे.
इथे कधी ‘कच्चा बदाम’, ‘माणिके मगे हिते’ किंवा कधी लहानपणीचं प्रेम लोकांच्या आवडीचं ठरतं. आजकाल असाच एक ट्रेंड लोकांमध्ये चर्चेत आहे. ते म्हणजे गाणं नव्हे तर आरती. ज्यावर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये लोक नाचतायत आणि मजा करतायत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेनच्या कम्पार्टमेंटमध्ये जवळपास 15 जणांचा ग्रुप उपस्थित दिसत आहे.
View this post on Instagram
यांनी गळ्यात पांढरी चादर घातली आहे आणि सर्वांनी डोळ्यांवर चष्मा लावला आहे आणि मागे आरती कुंज बिहारी यांचे गाणे वाजत आहे आणि प्रत्येकजण ठरलेल्या स्टेप्स वर नाचताना दिसतोय. या सर्व लोकांच्या स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स सारखेच आहेत, ज्यामुळे व्हिडिओ अधिक सुंदर होत आहे.
