AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेलिब्रिटींच्या नावाने फसवणूक होतेय?कोणत्याही गोष्टीवर क्लिक करण्याआधी ‘हे’ नक्की वाचा

तुमचा आवडता स्टार तुम्हाला 'या' स्कीममध्ये पैसे लावा, लगेच श्रीमंत व्हा' असं सांगणारा व्हिडीओ दिसला तर? विश्वास ठेवाल ना? पण सावधान! तुमचा हा विश्वासच तुम्हाला मोठ्या घोटाळ्यात अडकवू शकतो! कारण आजकाल सेलिब्रिटींच्या नावाने, त्यांच्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट व्हिडिओंनी फसवणुकीचा एक नवा फंडा सुरू झालाय. Meta ने नुकताच अशा हजारो अकाऊंट्सवर बडगा उगारलाय! चला, पाहूया हा घोटाळा कसा होतो आणि तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता!

सेलिब्रिटींच्या नावाने फसवणूक होतेय?कोणत्याही गोष्टीवर क्लिक करण्याआधी 'हे' नक्की वाचा
scammers using celebrity namesImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: May 17, 2025 | 12:32 AM
Share

आजकाल सोशल मीडियावर आपण अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटपटू किंवा प्रसिद्ध उद्योजकांना विविध उत्पादनांची किंवा योजनांची जाहिरात करताना पाहतो. पण विचार करा, जर तुम्हाला असा एखादा व्हिडीओ दिसला ज्यात तुमचा आवडता स्टार तुम्हाला एखाद्या गुंतवणूक योजनेत पैसे लावायला किंवा जुगाराच्या वेबसाइटवर जायला सांगतोय, तर तुम्ही काय कराल? अनेकजण त्यांच्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवण्याचा विचार करू शकतात. पण थांबा! हा खूप मोठा घोटाळा असू शकतो!

Facebook आणि Instagram पालक कंपनी असलेल्या मेटाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. त्यांनी २३,००० पेक्षा जास्त बनावट फेसबुक अकाउंट्स आणि पेजेस डिलीट केले आहेत. ही खाती भारत आणि ब्राझीलमधील लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली फसवण्यासाठी वापरली जात होती.

कशी होत होती फसवणूक?

1. ते प्रसिद्ध युट्युबर्स, क्रिकेटपटू आणि उद्योजकांचे बनावट डीपफेक व्हिडीओ तयार करत होते. या व्हिडीओमध्ये असं दाखवलं जायचं की हे सेलिब्रिटी काही विशिष्ट गुंतवणूक ॲप्स किंवा जुगाराच्या वेबसाइट्सची जाहिरात करत होते आणि लोकांना त्यात पैसे गुंतवण्याचा सल्ला देत होते.

2. सोशल मीडियावर ‘झटपट श्रीमंत व्हा’, ‘घरबसल्या लाखो कमवा’ अशा आकर्षक ऑफर्सच्या पोस्ट्स टाकून लोकांचं लक्ष वेधून घेतलं जायचं.

3. जे लोक या ऑफर्सना प्रतिसाद देत, त्यांना WhatsApp किंवा Telegram सारख्या चॅटिंग ॲप्सवर आणून गुंतवणुकीसाठी तयार केलं जायचं.

4. ग्राहकांना जुगाराचे किंवा खोटे गुंतवणुकीचे ॲप्स डाउनलोड करायला लावले जायचे. यात एकदा पैसे गुंतवले की ते परत मिळण्याची शक्यता जवळपास नसायचीच.

Meta काय म्हणतंय?

मेटाने सांगितलं आहे की, हे घोटाळेबाज लोकांना Cryptocurrency, शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करतात. याशिवाय, अनेक घोटाळेबाज ‘Facebook Marketplace’ वर स्वतःला खरे विक्रेते दाखवून वस्तू विकण्याच्या बहाण्याने लोकांकडून Advance Payment घ्यायचे आणि नंतर वस्तू न पाठवता गायब व्हायचे. एका वेगळ्या प्रकारच्या फसवणुकीत, घोटाळेबाज खरेदीदाराला जाणूनबुजून जास्त पैसे पाठवायचे आणि नंतर ‘चुकून जास्त आले’ असं सांगून Refund मागायचे. नंतर मूळ पेमेंट रद्द करून दोन्ही रक्कम घेऊन पसार व्हायचे.

अशा फसवणुकींना आळा घालण्यासाठी मेटाने आपल्या प्लॅटफॉर्मवर अधिक सतर्कता बाळगायला सुरुवात केली आहे. जर कोणतं अकाउंट संशयास्पद वाटलं किंवा वस्तू Delivery करण्यापूर्वीच पेमेंट मागितलं, तर यूजर्सना तशी चेतावणी दाखवली जाईल. सेलिब्रिटींच्या नावावर चालणाऱ्या घोटाळ्यांना पकडण्यासाठी कंपनी आता चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या तंत्रज्ञानाचाही वापर करत आहे.

मेटाने हेही सांगितलं की, ऑनलाइन सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी ते भारत सरकारच्या दूरसंचार विभाग (DoT), ग्राहक व्यवहार विभाग (DoCA) आणि भारतीय सायबर क्राईम केंद्र यांसारख्या अनेक एजन्सीसोबत मिळून काम करत आहेत. कंपनीने देशातील ७ राज्यांमध्ये पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसाठी घोटाळ्यांना सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या आहेत.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.