Video: बकरीच्या पाठीवर माकडाच्या पिलाची सवारी, तब्बल दीड कोटी लोकांची व्हिडीओला पसंती

बकरी जवळ आल्यानंतर कळतं की, हे माकडाचं पिल्लू आहे, ज्याने आई समजून बकरीला गच्च मिठी मारली आहे.

Video: बकरीच्या पाठीवर माकडाच्या पिलाची सवारी, तब्बल दीड कोटी लोकांची व्हिडीओला पसंती
माकड आणि बकरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

इंटरनेटवर तुम्हाला ढिगाने प्राण्यांचे व्हिडीओ सापडतील. काही प्राण्यांचे व्हिडीओ असे असतात की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य येते. आता माकड आणि बकरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये दोघेही बेरी खाताना दिसत आहेत. प्रत्येकाला हा व्हिडिओ खूप आवडत आहे. नेटकरी या व्हिडीओवर व्यक्त होताना दिसत आहेत. ( baby-monkey-riding-on-the-goat-back-video-won-the-hearts-of-the-people-watch-video-viral video animal video animal video)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलात एक माणूस हातात बेरी घेऊ येतो आणि आपल्या बकरीला जोरात हाक मारतो. हाक ऐकून बकरी त्या व्यक्तीच्या दिशेने पळत येते. बकरी जशीजशी जवळ येते, तसं त्या बकरीच्या मानेला काहीतरी चिटकलं असल्याचं आपल्याला दिसतं. बकरी जवळ आल्यानंतर कळतं की, हे माकडाचं पिल्लू आहे, ज्याने आई समजून बकरीला गच्च मिठी मारली आहे. दोघेही जवळ येतात, आणि या व्यक्तीच्या हातातील बेरी खाण्यास बकरी सुरुवात करते. माकडाचं पिल्लू मात्र थोडं विचारात आहे. काही वेळाने हिंमत करुन ते एक बेरी उचलतं आणि तोंडात टाकतं, त्याला ती बेरी आवडते, नंतर ते त्या बकरीच्या पाठीवर बसून बेरी खाण्यास सुरुवात करतं.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे, लोक यावर खूप व्यक्त होत आहेत. ट्वीटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे, जो आतापर्यंत हा व्हिडीओ तब्बल 1 कोटी 75 लाख लोकांनी पाहिला आहे. म्हणजे हा व्हिडीओ किती गाजला आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता. तब्बल 1 लाख 43 हजार लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावरुन प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर किती पाहिले जातात याचा अंदाज तुम्हाला येईल.

माकड आणि बकरीचा हा गोंडस व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर पेजवरही पाहायला मिळत आहे. या व्हिडिओने लोकांची मनं जिंकली आहेत. तुमच्या माहितीसाठी, हा व्हिडीओ सर्वात आधी अॅनिमल होम या यूट्युब चॅनलवर पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लोकांनी शेअर केला. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ, आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा.

हेही पाहा:

आरे कॉलनीत 64 वर्षांच्या आजीवर बिबट्याचा हल्ला, आजीने काठीने बिबट्याचं तोंड फोडलं, व्हिडीओ व्हायरल

Video: आरे मेट्रो कारशेडच्या पत्र्याजवळ बिबट्याचं गोंडस पिल्लू, वनविभागाकडून पिल्लू रेस्क्यु, व्हिडीओ व्हायरल!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI