Video: ‘त्याने रागा रागात हॉर्न दिला, याने त्यावर डान्स केला’, कार चालकाचं मुजोर ट्रक चालकाला भन्नाट प्रत्युत्तर

ट्रक ड्रायव्हर त्याच्या समोर सिग्नलवर थांबलेल्या कारचालकाला जोरजोरात हॉर्न देतो. त्यावर कारचालक जे काही करतो, त्यावर पाहणारेही आश्चर्यचकीत होतात.

Video: 'त्याने रागा रागात हॉर्न दिला, याने त्यावर डान्स केला', कार चालकाचं मुजोर ट्रक चालकाला भन्नाट प्रत्युत्तर
ट्रक चालकाने हॉर्न दिल्यानंत कार चालकाचा रस्त्यावर डान्स

आजच्या जगात कुणाला मागं राहायचं नाही, सगळ्यांना पुढं जायचं असतं. तुम्ही ड्रायव्हींग करत असाल तर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाल आपली गाडी पुढं न्यायची घाई असते. अशावेळी कुठला ड्रायव्हर वा गाडी तुमच्या मार्गात आली तर राग अनावर होता. आणि अशावेळी रस्त्यावर भांडणं होतानाही आपण पाहतो. इंटरनेटवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक ट्रक ड्रायव्हर त्याच्या समोर सिग्नलवर थांबलेल्या कारचालकाला जोरजोरात हॉर्न देतो. त्यावर कारचालक जे काही करतो, त्यावर पाहणारेही आश्चर्यचकीत होतात. ( Car driver dances to the beat of a truck driver’s horn at a traffic signal, viral video )

या व्हिडीओत दिसत आहे की, ट्रॅफिक सिग्नलवर एका कारच्या मागे एक ट्रक थांबला आहे. मात्र ही गोष्ट ट्रक चालकाला काही पटत नाही, त्याचा अहंकार दुखावतो आणि तो कार चालकाला जोर जोरात हॉर्न द्यायला सुरुवात करतो. यानंतर कार चालक बाहेर येतो आणि त्याच्या हॉर्नच्या तालावर नाचायला लागतो. रस्त्यावरच हा सगळा प्रकार सुरु राहतो. कार चालक नाचण्याच्या प्रकाराने ट्रक चालक चिडतो आणि तो आणखी जोरजोरात हॉर्न वाजवायला लागतो, त्यावर पुन्हा एकदा कार चालक नाचायला लागतो.

व्हिडीओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY -mEmE pAgE- (@giedde)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक यावर व्यक्त होताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकानं लिहलं, जगात खरोखरच किती वेगवेगळ्या प्रवृ्त्तीचे लोक असतात. तर दुसऱ्याने लिहलं, चौकात असा राडा करणं किती बरोबर आहे तर एकाने लिहलं, ट्रक चालकाची कार चालकाने चांगलीच जिरवली, ट्रक चालकाच्या मुजोरीला याहून चांगलं उत्तर असूच शकत नाही.

Giedde नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ इंटरनेटवर टाकण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, संकटांचं संधीत रुपांतर कसं करायचं हे या कार चालकाकडून शिकायला हवं. हा व्हिडीओ अनेक लोकांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे.

हेही वाचा:

Video | लसीकरणाचा पुरावा मागितल्याचा राग, हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्याला तिघी जणींची मारहाण

Video | भर रस्त्यात म्हणतोय लस घ्या…लस घ्या….माणसाच्या कारनाम्याची एकच चर्चा, व्हिडीओ व्हायरल

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI