Viral Video : श्वानाला वाचवण्यासाठी मांजर पुढे सरसावली, नेटकरी म्हणाले ‘हीच खरी मैत्री…’

तुम्ही अनेकदा कुत्रा आणि मांजर एकमेकांशी भांडताना पाहिले असतील. दोघंही एकमेकांना बघताच भांडणं सुरू करतात, मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, एक मांजर कुत्र्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मांजरीशी भांडताना दिसत आहे. (Cat moves forward to save dog, netizen says 'this is true friendship ...')

Viral Video : श्वानाला वाचवण्यासाठी मांजर पुढे सरसावली, नेटकरी म्हणाले 'हीच खरी मैत्री...'

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ (Animal Videos) आणि फोटो व्हायरल (Viral Videos) होत असतात, हे व्हिडीओ आणि फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. विशेषतः प्राण्याच्या भांडणांचे व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असतात. नुकतंच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक मांजर कुत्र्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मांजरीशी भांडताना दिसतेय.

तुम्ही अनेकदा कुत्रा आणि मांजर एकमेकांशी भांडताना पाहिले असतील. दोघंही एकमेकांना बघताच भांडणं सुरू करतात, मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, एक मांजर कुत्र्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मांजरीशी भांडत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा कुत्रा मांजरापासून धोक्यात येतो, तेव्हा दुसरी मांजर बेंचवरून उडी मारते आणि बाल्कनीवर उभ्या असलेल्या मांजरीवर हल्ला करते. ती त्याच्या चेहऱ्यावर कडक पंजे मारते आणि त्याला जमिनीवर सोडते. मांजरीनं दाखवलेल्या या प्रतिक्रियेमुळे, कुत्रा या घटनेतून थोडक्यात बचावला.

पाहा व्हिडीओ

 

सोशल मीडियावर कुत्रा आणि मांजर मैत्रीचा हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरला आहे. यामुळेच नेटकऱ्यांनी त्यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका वापरकर्त्यानं म्हटलं, ‘कुत्रा आणि मांजर यांची एवढी मैत्री यापूर्वी कधीच पाहिली नाही…’ तर दुसऱ्या वापरकर्त्यानं असं लिहिलं की, ‘हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असं वाटतंय की शत्रूही खरंच मित्र बनू शकतात.’ तर आणखी एकानं लिहिलं, ‘मांजरीनं आपल्या ग्रुपची फसवणूक केली आहे.’ याशिवाय इतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेदार कमेंट्स केल्या.

हा मजेदार व्हिडिओ रेक्स चॅपमन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओसोबतच त्यानं कॅप्शन लिहिलं, “तू त्याला स्पर्श करण्याची हिंमत करू नकोस…” बातमी तयार करेपर्यंत या मजेदार व्हिडीओला 6.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

संबंधित बातम्या

VIDEO : अरेच्चा! हे अस्वल तर फुटबॉलपटूंनाही लाजवेल, दमदार फुटबॉल स्कील्स पाहतच रहाल

VIDEO | केस कापताना चिमुकल्याने फोडला हंबरडा, नंतर एका मिनिटात शांत, लोकांनी काय केलं एकदा पाहाच !

VIDEO : पिझ्झा पाहून बाळाने दिली लाखमोलाची Reaction, व्हिडीओ पाहून नेटकरीही खुश

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI