VIDEO | झूम… झूम… झूम……झूम; दारुड्याच्या करामती एकदा पाहाच

दारु पिऊन पूर्ण नशेत असलेला असा एक माणूस समोर आला आहे; ज्याच्या करामती पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. (drunk man viral video)

VIDEO | झूम... झूम... झूम......झूम; दारुड्याच्या करामती एकदा पाहाच
DRUNKEN MAN

मुंबई : दारु ही अशी गोष्ट आहे जी भल्याभल्यांना झुलायला लावते. एखाद्याने दारू पिल्यानंतर तो बरळत, बडबडत असल्याचे आपण सर्रास पहातो. मात्र, यावेळी दारु पिऊन पूर्ण नशेत असलेला असा एक माणूस अजब प्रकार करत असलेल्याचे समोर आले आहे; त्याच्या करामती पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या माणसाच्या करामतीचा  व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत असून तो एका आयपीएस अधिकाऱ्याने ट्विटरवर अपलोड केला आहे. (drunk man forgot to ride bicycle video goes viral)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा व्डिडीओ अगदीच भन्नाट आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा हसू आवरणार नाही. व्हिडीओमध्ये एक माणूस दारू पिल्यामुळे पूर्ण नशेत असल्याचे दिसत आहे. त्याच्या हातात एक सायकल आहे. या सायकलीला चालवण्याऐवजी हा माणूस तिला चक्क हातात घेऊन फिरतो आहे. तसेच, काही वेळानंतर हातातली सायकल खाली ठेवून नंतर तो तिला चालवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर एक-दोन पावलं टाकून हा माणूस सायकलवर बसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतेय. एकदा सायकलवर बसल्यानंतर तोल गेल्यामुळे तो रस्त्यावर पडल्याचेसुद्धा स्पष्टपणे दिसत आहे. जास्त प्रमाणात दारु पिल्यामुळे या माणसाला आपली चप्पल आणि सायकल चालवण्याचेसुद्धा भान राहत नाहीये. तोल सावरण्याची तो करत असलेली धडपड अगदीच पाहण्यासारखी आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ आयपीएस ऑफिसर रुपीन शर्मा (IPS Officer Rupin Sharma) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताच त्याला मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘टुन्न…. सैलेरी का दिन, निडणुकीचे दिवस आले’ अशा मजेदार कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ 30 मार्च रोजी पोस्ट केला होता. त्यानंतर या दोन दिवसांत या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळत आहे.

इतर बातम्या :

April Fools Day 2021 : केवळ ‘फूल’ डे नाही तर या खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे ‘1 एप्रिल’

Video | समुद्रात जाऊन तरुणांची मस्ती, मुंबई पोलिसांनी थेट कोंबडा होऊन पळायला लावलं, व्हिडीओ व्हायरल

video | पठ्ठ्याचा डान्स पाहून अनेकजण फिदा, लोक म्हणातायत हा तर दुसरा मायकल जॅक्सन !, डान्सचा व्डिडीओ व्हायरल

(drunk man forgot to ride bicycle video goes viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI