AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

April Fools Day 2021 : केवळ ‘फूल’ डे नाही तर या खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे ‘1 एप्रिल’

रिझर्व्ह बँकेची भारतात स्थापना आणि अमेरिकेत अॅपलची स्थापना या शतकातील काही प्रमुख घटनांपैकी एक आहेत, ज्याचा साक्षीदार 1 एप्रिलचा दिवस आहे. (April 1 is famous not only for silly days but also for these special reasons)

April Fools Day 2021 : केवळ 'फूल' डे नाही तर या खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे '1 एप्रिल'
केवळ फूल डे नाही तर या खास कारणांसाठी प्रसिद्ध आहे 1 एप्रिल
| Edited By: | Updated on: Apr 01, 2021 | 7:13 AM
Share

नवी दिल्ली : जगभरातील लोक भलेही 1 एप्रिल रोजी एकमेकांना मूर्ख बनवण्याचा आनंद घेतात, परंतु या तारखेला इतिहासामध्ये बर्‍याच मोठ्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेची भारतात स्थापना आणि अमेरिकेत अॅपलची स्थापना या शतकातील काही प्रमुख घटनांपैकी एक आहेत, ज्याचा साक्षीदार 1 एप्रिलचा दिवस आहे. भारतात 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आणि 1 जानेवारी 1949 रोजी त्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ही केंद्रीय बँकिंग प्रणाली असून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे याची क्षेत्रीय कार्यालये आहेत. (April 1 is famous not only for silly days but also for these special reasons)

अमेरिकन कंपनी अॅपल कंपनीबद्दल बोलायचे झाले तर हे एखाद्या परीकथेसारखे आहे. कॅलिफोर्मियामध्ये 1 एप्रिल 1976 रोजी स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझनिआक आणि रोनाल्ड वेन यांनी अॅपल इंकची स्थापना केली. सुरुवातीला याच्या नावात कॉम्प्युटर हा शब्द देखील जोडण्यात आला होता, परंतु 9 जानेवारी 2007 रोजी याच्या नावातून कॉम्प्युटर हा शब्द काढून टाकला गेला आणि स्टीव्ह जॉब्सने पहिला आयफोन बाजारात लॉन्च केला. अॅपल कमाईच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी बनली आणि फोन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली.

देश आणि जगाच्या इतिहासामध्ये 1 एप्रिलच्या तारखेला नोंदवलेल्या इतर प्रमुख घटनांचा क्रम खालीलप्रमाणे

1582 : फ्रान्समध्ये हा दिवस मूर्ख दिवस म्हणून साजरा करण्यास सुरवात होते. 1793 : जपानमध्ये उनसेन ज्वालामुखी फुटले आणि सुमारे 53,000 लोक ठार झाले. 1839 : कोलकाता मेडिकल कॉलेज आणि 20 बेडचे रुग्णालय सुरू झाले. 1869 : आयकरची सुरुवात करण्यात आली. 1869 : एक नवीन घटस्फोट कायदा अस्तित्त्वात आला. 1878 : कलकत्ता संग्रहालय सध्या अस्तित्त्वात असलेल्या इमारतीत जनतेसाठी उघडण्यात आले. 1882 : टपाल बचत बँक प्रणालीची ओळख. 1889 : हिंदूचे दैनिक वृत्तपत्र म्हणून प्रकाशन सुरू झाले. 20 सप्टेंबर 1888 पासून प्रकाशित हे वृत्तपत्र साप्ताहिक रुपात प्रकाशित करण्यात येत होते. 1912 : भारताची राजधानी औपचारिकपणे कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली. 1930 : विवाहासाठी मुलींचे किमान वय 14 वर्षे आणि मुलाचे वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले. 1935 : भारतीय रिझर्व बँकेची स्थापना. 1935 : भारतीय पोस्टल ऑर्डरची सुरुवात. 1936 : ओरिसा राज्याची स्थापना. हे राज्य बिहारमधून वेगळे करुन करण्यात आले. 1937 : माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा जन्म. 1954 : सुब्रत मुखर्जी हे भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख झाले. 1954 : कलकत्तामध्ये साउथ प्वाईंट स्कूलची स्थापना, जी 1988 मध्ये जगातील सर्वात मोठी शाळा बनली. 1956 : कंपनी कायदा लागू करण्यात आला. 1957 : दाशमिक मुद्रा :डेसिमल कोएनेज:ची सुरुवात म्हणून एक पैसा चालवण्यात आला. याच आधारावर टपाल तिकिटांची विक्रीही सुरू झाली. 1962 : मिट्रिक भार सिस्टम पूर्णपणे स्वीकारण्यात आली. 1969 : देशातील पहिले अणु उर्जा केंद्र तारापूरमध्ये सुरू झाले. 1973 : भारतात जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये वाघ संरक्षण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. 1976 : दूरदर्शन या नावाने स्वतंत्र टेलिव्हिजन कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. 1976: स्टीव्ह जॉब्सने आपल्या मित्रांसोबत मिळून अॅपल कंपनीची स्थापना केली. 1978 : भारताच्या सहाव्या पंचवार्षिक योजनेस प्रारंभ. 1979 : इराण इस्लामिक गणराज्य झाले. 1992: आठव्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात 2004 : गुगलने जीमेलची घोषणा केली. 2010 : देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा तपशील नोंदीसह देशातील 15 व्या जनगणनेचे काम सुरू झाले. (April 1 is famous not only for silly days but also for these special reasons)

इतर बातम्या

video | पठ्ठ्याचा डान्स पाहून अनेकजण फिदा, लोक म्हणातायत हा तर दुसरा मायकल जॅक्सन !, डान्सचा व्डिडीओ व्हायरल

केंद्र सरकारची शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा, नवीन रोजगारासह मिळतील हे फायदे

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.