अंगावर फाटलेले कपडे, पडझड झालेले घर.. वृद्ध महिलेचे मृत्यपत्र वाचून थक्क झाले गावकरी, एवढी संपत्ती…
महिलेचं घर बिकट अवस्थेत होतं आणि बागेचीही स्वच्छता होत नव्हती, त्यामुळे लोक तिला गरीब समजत होते. तिच्या मृत्यूनंतर जेव्हा तिचे मृत्यपत्र वाचले गेले, तेव्हा लोकांना विश्वासच बसला नाही. ते आपसात कुजबुज करू लागले की हे कसं शक्य आहे?

असं म्हणतात की कोणालाही पाहून त्याच्या संपत्तीचा अंदाज लावता येत नाही. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल फक्त तितकंच जाणतो, जितकं दोन-चार भेटींमध्ये समजतं. त्यापलीकडे तो कसा आहे आणि त्याच्याकडे काय आहे, याची आपल्याला कल्पना नसते. अशा परिस्थितीत जेव्हा काहीतरी अनपेक्षित घडतं, तेव्हा आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे.
ज्या व्यक्तीकडे जास्त संपत्ती असते, तो अनेकदा आपले मृत्यपत्र आधीच बनवतो आणि ते त्याच्या मृत्यूनंतरच उघडून वाचले जाते. आज आपण एका गरीब महिलेच्या मृत्यूपत्राबद्दल जाणून घेणार आहोत. तिचं घर खराब अवस्थेत होतं आणि बागेचीही स्वच्छता होत नव्हती. तिच्या मृत्यूनंतर जेव्हा तिचे मृत्यूपत्र वाचले गेले, तेव्हा लोकांना त्यावर विश्वासच बसला नाही. ते आपसात कुजबुज करू लागले की हे कसं शक्य आहे?
मृत्यूपत्रात काय होतं?
हिल्दा लेवी नावाची एक महिला केंटच्या व्हिसिलटेबल येथे राहत होती. ती 1970 मध्ये बांधलेल्या एका सेमी डिटॅच्ड घरात राहत होती आणि तिचा मृत्यू 98 व्या वर्षी झाला. जेव्हा तिचे मृत्यूपत्र वाचले गेले, तेव्हा त्यात एकूण 1.4 मिलियन पाउंड म्हणजेच सुमारे 16 कोटी रुपये असल्याचं समोर आलं. यापैकी साडेपाच कोटी रुपये तिच्या मित्रांना आणि कँटरबरी रुग्णालयाला देण्यात आले होते. याशिवाय, सुमारे 3 कोटी रुपये लंडनच्या व्हिसिलटेबल हेल्थकेअर आणि मूरफिल्ड्स आय हॉस्पिटलमधील तिच्या मित्रांच्या नावे करण्यात आले होते. चॅरिटीला दिलेल्या पैशांबद्दल ऐकून लोक थक्क झाले, कारण तिचं घर इतक्या खराब अवस्थेत होतं की ती कोट्यधीश आहे असं अजिबात वाटत नव्हतं.
इतके पैसे कुठून आले?
जेव्हा हिल्दा लेवीबद्दल अधिक माहिती काढली गेली, तेव्हा समोर आलं की ती 1930 च्या दशकात जर्मनीहून इंग्लंडला निर्वासित म्हणून आली होती. तिच्या कुटुंबाचा मृत्यू होलोकॉस्टमध्ये झाला होता. ती अनाथ होती आणि इंग्लंडमध्ये एलन जेफरी नावाच्या महिलेने तिला दत्तक घेतलं होतं. ती डॉ. फ्रीडरिक आणि मिसेस इर्मा लेवी यांची मुलगी होती. तिने इंग्लंडमध्येच आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. तिच्या पैशांबाबत बोलायचं तर, असं समजलं की हे तिच्या एका काकांच्या मालमत्तेतील हिस्सा होता, जे अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले होते. त्यांनी आपली 300 कोटींहून अधिक संपत्ती भावंडांच्या कुटुंबियांना आणि लांबच्या नातेवाईकांमध्ये वाटली होती. हिल्दालाही त्याच मालमत्तेतील हिस्सा मिळाला होता.
