Video | एकदम झक्कास ! नवरीच्या काका-वडिलांचा धमाकेदार डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

लग्न सोहळ्यातील व्हिडीओ तर खास आवडीने पाहिले जातात. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरीच्या वडिलांनी मजेदार डान्स केला आहे. नवरीचे वडील आणि काका सोबतच थिरकले आहे.

Video | एकदम झक्कास ! नवरीच्या काका-वडिलांचा धमाकेदार डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
MARRIAGE VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओंना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. लग्न सोहळ्यातील व्हिडीओ तर खास आवडीने पाहिले जातात. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरीच्या वडिलांनी मजेदार डान्स केला आहे. नवरीचे वडील आणि काका सोबतच थिरकले आहे.

नवरीचे वडील आणि काका यांचा सोबत डान्स 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील असून त्यामध्ये नवरीचे वडील आणि काका सोबत डान्स करत आहेत. सजवलेल्या स्टेजवर दोघेही उभे आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सारख्याच रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. कुर्ता, पायजामा आणि जॅकेट असा त्यांचा वेश आहे. या कपड्यांत त्यांनी स्टेरजवर धम्माल उडवून दिलीय.

डान्स पाहणारे अवाक्, स्टेजवर धमाकेदार डान्स 

सुरुवातील त्यानी माय नेम ईज लखन या गाण्यावर डान्स केलाय. त्यानंतर लगेच गाण्याचे बोल बदलले आहे. त्यानंतर त्यांनी शेक इट लाइक शम्मी या धमाकेदार गाण्यावर ठेका धरलाय. विशेष म्हणजे हे दोघेही सोबतच डान्स करत आहेत. या परफॉर्मन्ससाठी त्यांनी घरी चांगलाच सराव केलेला असणार हे यावरुन स्पष्टपणे दिसत आहे. दोघेही डान्स करत असताना खाली लोक उभे आहेत. ते मोठ्या आनंदात नवरीचे वडील आणि काका यांना प्रोत्साहित करत आहेत. तसेच खाली असलेले लोक या जोडीचे फोटो तसेच व्हिडीओ शूट करण्यात व्यस्त असल्याचे दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खूश झाले असून काही नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रमाच्या anushaweddingchoreography’s या अकाऊंटवर पाहता येईल. या व्हिडीओला काही तासांच्या आत दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

इतर बातम्या :

Video: पाण्यात कासव आणि मगरीचं हात मिळवून ‘हाय-हॅलो’, नेटकरी म्हणाले, असा व्हिडीओ आधी पाहिला नाही

Viral: बर्फावर दोन पांडांची मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवलं त्यांचं बालपण!

Yogi Aadityanath: जेव्हा योगी आदित्यनाथ मंचावर एका भाजप नेत्यावर भडकतात, बघा Video


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI