Kangaroo बनला पर्सनल ट्रेनर, पुश-अपला करतोय सपोर्ट, Video Viral

Kangaroo बनला पर्सनल ट्रेनर, पुश-अपला करतोय सपोर्ट, Video Viral
पुश-अप्सला सपोर्ट करताना कांगारू

तुम्ही टीव्हीवर कांगारू पाहिलाच असेल. पण प्रत्यक्षात पाहण्यासाठी तुम्हाला ऑस्ट्रेलिया(Australia)ला जावं लागेल. एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक तरुण कांगारू एका व्यक्तीला पुश-अप (Push Ups) करण्यासाठी सपोर्ट म्हणजेच मदत करताना दिसत आहे.

प्रदीप गरड

|

Jan 24, 2022 | 12:13 PM

Kangaroo Workout Video : तुम्ही टीव्हीवर कांगारू पाहिलाच असेल. पण प्रत्यक्षात पाहण्यासाठी तुम्हाला ऑस्ट्रेलिया(Australia)ला जावं लागेल. कारण कांगारू फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतात. हा तिथला राष्ट्रीय प्राणीही आहे. त्यांना जगातला एक अनोखा प्राणी मानलं जातं, कारण त्यांचे मागचे पाय लांब आणि पुढचे लहान असतात, ज्यामुळे ते फिरतात. कांगारूंबद्दल तुम्हाला क्वचितच माहित असेल, की ते कधीही उलटे चालू शकत नाहीत. कांगारूंशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. ते मजेशीरही असतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक तरुण कांगारू एका व्यक्तीला पुश-अप (Push Ups) करण्यासाठी सपोर्ट म्हणजेच मदत करताना दिसत आहे. त्याच्याकडे बघून जणू तोच त्याचा ट्रेनर आहे, असं वाटतं.

पुश-अप करणाऱ्यास मदत

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की तो माणूस पुश-अप करत आहे आणि छोटा कांगारू त्याला मदत करत आहे. ती व्यक्ती उठताच कांगारू त्याला खाली प्रेस करू लागतो. तो त्याला क्षणभरही सोडत नाही. जसे की तो निघून गेला तर ती व्यक्ती पुश-अप मारूच शकणार नाही.

कांगारूचा अंदाज हटकेच

अलीकडेच एका मांजरीचा पुश-अप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, मात्र हा व्हिडिओ त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यामध्ये छोटा कांगारू ट्रेनर बनला आहे, जो व्यायाम करून घेत आहे. हा खूपच मजेदार व्हिडिओ आहे. तुम्ही याआधी क्वचितच एखाद्या प्राण्याला आणि विशेषतः कांगारूला असं करताना पाहिलं असेल. कुत्रे हे करताना दिसतात, पण कांगारूचा हा अंदाज काही हटकेच आहे.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. तर 7 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे.

मजेशीर कमेंट्स

व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की ‘यह मैक्सिमम क्यूटनेस अलर्ट है’, तर इतर अनेक यूझर्सनी व्हिडिओला मस्त असल्याचं म्हटलंय.

Bharat ki naari sab par bhaari! : कोरोना वडा कधी पाहिलाय किंवा खाल्लाय का? नसेल तर पाहा हा Video

Video : नात्यागोत्यांच्या पलिकडचा लळा, हिंगोलीत गाईच्या वासराला चक्क शेळीचा पान्हा!

80 point turn : धोकादायक टेकडीवरून अशी काही गाडी वळवली, चित्तथरारक व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा! पाहा Video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें