AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना आता त्यांच्या भाषेतच मिळणार मदतीचा हात; सरकारने लाँच केला ‘हा’ नवा चॅटबॉट

शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारनं एक असा उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे शेतीसंबंधित माहिती मिळवणं अधिक सोपं होणार आहे. हा उपक्रम कसा वापरायचा आणि तो तुमच्या शेतीसाठी कसा उपयुक्त ठरेल, हे आपण या लेखात पाहणार आहोत.

शेतकऱ्यांना आता त्यांच्या भाषेतच मिळणार मदतीचा हात; सरकारने लाँच केला 'हा' नवा चॅटबॉट
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jul 07, 2025 | 2:43 PM
Share

भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि डिजिटल पायरी उचलली आहे. आता शेतकऱ्यांना आपल्या भाषेतच त्यांच्या अडचणींचं समाधान मिळणार आहे. केंद्र सरकारने ‘किसान-E-मित्र’ नावाचा एक स्मार्ट आणि AI आधारित चॅटबॉट लाँच केला आहे, जो PM किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे. या चॅटबॉटचा उद्देश शेतकऱ्यांच्या समस्यांना तत्काळ आणि अचूक उत्तरं देणं आहे.

काय आहे ‘किसान-E-मित्र’?

‘किसान-E-मित्र’ हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित चॅटबॉट आहे जो मोबाईल आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे 2447 उपलब्ध आहे. म्हणजे, कोणत्याही वेळी शेतकरी आपल्या मोबाईलवरून प्रश्न विचारू शकतात आणि लगेचच या चॅटबॉटकडून सोप्या भाषेत उत्तरं मिळवू शकतात.

या चॅटबॉटद्वारे शेतकरी खालील माहिती सहज मिळवू शकतात:

1. PM किसान योजना संबंधित माहिती

2. हवामान अहवाल

3. पीक विमा योजना

4. ई-केवायसी अपडेट्स

5. इतर कृषी संबंधित बाबी

शेतकऱ्यांना फक्त व्हॉट्सअ‍ॅप नंबर 99915 22222 वर “हाय” किंवा आपला प्रश्न पाठवायचा आहे. हा चॅटबॉट लगेचच टेक्स्ट किंवा व्हॉइस स्वरूपात उत्तर देतो. हे संपूर्ण तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) विकसित केलं आहे.

किती भाषांमध्ये मिळते सेवा?

किसान-E-मित्र चॅटबॉट 11 भारतीय भाषांमध्ये काम करतो ज्यामध्ये हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हा चॅटबॉट भाषेतील किंवा स्पेलिंगमधील लहान चुका देखील समजून घेतो आणि तरीही योग्य उत्तर देतो.

रिपोर्ट्सनुसार, हा चॅटबॉट दररोज सुमारे 25,000 प्रश्नांची उत्तरे देत आहे, आणि आतापर्यंत 10 लाखांहून अधिक प्रश्नांची उत्तरं देण्यात यशस्वी झाला आहे.

‘किसान-E-मित्र’ केवळ शेतीपुरताच मर्यादित नाही, तर सरकार लवकरच आरोग्यसेवा, स्मार्ट सिटी, शिक्षण अशा अनेक क्षेत्रातही AI आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे. यामुळे नागरिकांना जलद, अचूक आणि सुलभ सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा डिजिटल टप्पा

‘किसान-E-मित्र’ ही शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल साथी प्रमाणे कार्य करत आहे. पूर्वी जिथे सरकारी योजनांची माहिती मिळवणं कठीण होतं, तिथे आता शेतकरी आपल्या भाषेत आणि सहज मोबाईलवरून ही माहिती घेऊ शकतात.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.