जॉबसाठी पुराव्यासह असा केला अर्ज की कंपनीला ही बसला धक्का, अर्ज सोशल मीडियावर व्हायरल

नोकरी मिळवण्यासाठी अनेक जण खूप मेहनत घेतात. अनेकदा नोकरी लवकर मिळतेच असे नाही. त्यासाठी विविध ठिकाणी अर्ज करावा लागतो. नोकरी मिळवण्यासाठी कोणी कुठल्या थराला जाऊ शकतो याचं एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल.

जॉबसाठी पुराव्यासह असा केला अर्ज की कंपनीला ही बसला धक्का, अर्ज सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 7:37 PM

जॉबसाठी लोकं वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. तुम्ही आतापर्य़ंत अनेक विचित्र ॲप्लिकेशन्स पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला जे जॉब ॲप्लिकेशन दाखवणार आहोत ते पाहून तुम्हीही डोक्याला हात मारुन घ्याल. त्याने तर कंपनीलाही धक्का दिला आहे. अकाऊंटंट पदासाठी अनेक वेळा अर्ज करुनही नोकरी मिळाली नाही. पण जेव्हा कंपनीच्या अकाऊंटंटचा मृत्यू झाला तेव्हा त्याने लगेच पुन्हा अर्ज केला. याशिवाय पद रिक्त असल्याचा पुरावाही त्यांनी सोबत जोडला. त्या व्यक्तीच्या अर्जाचा फोटो आता व्हायरल होत आहे.

अर्जात काय लिहिले आहे

अर्जात असे लिहिले आहे की, “मला तुमच्या कार्यालयातील अकाउंटंटच्या नुकताच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मी मरण पावलेल्या अकाउंटंटच्या जागी नोकरीसाठी अर्ज करत आहे.” त्या व्यक्तीने आपल्या अर्जात पुढे म्हटले आहे की, त्याने यापूर्वी अनेकदा अर्ज केला होता. मात्र प्रत्येक वेळी कंपनीने जागा रिक्त नसल्याचे सांगितले होते.

पुष्टी करण्यासाठी अंत्यसंस्कारात सहभागी झाला

पुढे त्याने असे ही लिहिले की, “प्रत्येक वेळी मी नोकरीसाठी अर्ज करत होतो. तेव्हा मला उत्तर मिळत होते की कोणतीही जागा रिक्त नाही, परंतु या प्रकरणात, मी तुम्हाला रंगेहाथ पकडले आहे आणि तुमच्याकडे कोणतीही माफी नाही. कारण जेव्हा मी सुट्टीसाठी माझ्या गावी होतो, तेव्हा मला त्याच्या मृत्यूची चांगली बातमी कळाली. म्हणून अर्ज करण्यापूर्वी तो खरोखर मरण पावला होता याची पुष्टी करण्यासाठी मी त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलो.”

अर्जात शोकसंदेशही जोडला

त्या व्यक्तीने त्याचा बायोडाटा आणि मृत अकाउंटंटचा शोकसंदेश त्याच्या अर्जासोबत जोडला आणि लिहिले, “यावेळी तुम्ही मला टाळू शकत नाही. मला नोकरी द्या.” या नोकरीच्या अर्जामुळे नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. आतापर्यंत हजारो यूजर्सनी याला लाईक केले असून ॲप्लिकेशनमधील शोकसंदेश पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

एका युजरने म्हटले की, ‘शोक संदेश जोडणे म्हणजे वेडेपणाच आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘जेव्हा मी सुट्टीच्या दिवशी माझ्या गावी होतो, तेव्हा मला अकाउंटंटच्या मृत्यूची माहिती मिळाली. जुन्या अकाउंटंटच्या हत्येचा संशय टाळण्यासाठी ही एक अनावश्यक गोष्ट आहे आणि निमित्त आहे.’ तिसऱ्या युजरने लिहिले, ‘मला हे जाणून घेणे आवश्यक आहे की त्याला नोकरी मिळाली की नाही. सस्पेन्स खूप जास्त आहे.’ एका यूजरने लिहिले, ‘तो मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आणि मृत्यूचे पुरावे गोळा करण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता. हे खूप विचित्र आहे.

Non Stop LIVE Update
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.