लाडकी बहिण योजनेतून हजारो महिलांची नावे हटवली, आपलं नाव यादीत आहे का?
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली असून लाखो महिलांना याचा लाभ मिळतोय. मात्र अलीकडे अनेक महिलांची नावे यादीतून वगळली गेली आहेत. तुमचं नाव आहे का? या स्टेप्स फाॅलो करा आणि लगेच तपासा

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना ही राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देणारी एक महत्वाची योजना आहे. योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. मात्र अलीकडेच एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने हजारो महिलांची नावे यादीतून वगळली आहेत. काही महिलांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांचे नावे हटवण्यात आली आहेत, तर काही प्रामाणिक महिलांचेही नावे चुकून वगळले गेल्याची शक्यता आहे. अशा वेळी तुमचं नाव यादीत आहे की नाही, हे तपासणं अत्यंत गरजेचं ठरतं. ही तपासणी आता तुम्ही घरबसल्या, मोबाईल किंवा संगणकावरून सहज करू शकता.
नावे का वगळली जात आहेत?
सरकारच्या माहितीनुसार, अनेक महिलांनी चुकीच्या माहितीच्या आधारे म्हणजे फसवणूक करून योजनेचा लाभ घेतला आहे. काही महिला या सरकारी नोकरीत असूनही लाभ घेत होत्या, तर काहींनी आपले उत्पन्न लपवले होते. त्यामुळे सरकारने आयटीआर (Income Tax Return) आणि इतर माहिती तपासून अशा महिलांची नावे यादीतून हटवली आहेत. त्यामुळे प्रामाणिक महिलांचे नावही काही वेळा चुकून वगळले गेले आहे.
तुमचं नाव वगळलं गेलंय का? अशा प्रकारे करा तपासणी
जर तुम्हाला शंका वाटत असेल की तुमचं नाव अजून योजनेत आहे का, किंवा ते वगळण्यात आलंय का, तर घराबसल्या तुम्ही तुमचं नाव ऑनलाइन चेक करू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
सर्वप्रथम योजनेची अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in या लिंकवर जा. त्यानंतर तुमचं नाव, आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका. काही क्षणात तुमच्या स्क्रीनवर तुमचं योजनेतील स्टेटस दिसेल.
जर तुमचं नाव यादीत असेल, तर समजून घ्या की तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे. पण जर “No Record Found” किंवा यासारखा संदेश आला, तर तुमचं नाव वगळण्यात आलं आहे.
अशा प्रकारे करा तक्रार
जर तुम्ही ना सरकारी नोकरीत असाल, ना आयटीआर भरला असेल, आणि तरीही तुमचं नाव यादीतून वगळलं असेल तर घाबरू नका. तुम्ही तुमच्या नजीकच्या लोकसेवा केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करू शकता.
तक्रार करताना तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, योजनेचा नोंदणी क्रमांक हे सर्व कागदपत्र सोबत बाळगा. याशिवाय, तुमचं बँक खाते आधारशी लिंक आहे का, ई-केवायसी झाली आहे का हे सर्व अपडेट करून ठेवा, अन्यथा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते.
शेवटचं महत्वाचं आवाहन
लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारची एक महत्वाकांक्षी आणि उपयोगी योजना आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेचा खरोखर लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपली सर्व माहिती योग्य प्रकारे भरावी, आणि फसवणूक करणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवावे.
सरकारकडून ही यादी दरमहा अपडेट केली जात असते. त्यामुळे जर सध्या नाव वगळलं गेलं असेल तरी योग्य कागदपत्रांसह तक्रार केल्यास तुमचं नाव पुन्हा यादीत समाविष्ट होऊ शकतं.
