AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangaroo in india : भारतातल्या जलपायगुडीत कांगारू? Video viral; काय आहे सत्य? वाचा सविस्तर

Kangaroo in india : कांगारू फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतो. त्याला कधी भारतात पाहिलंय का? अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कांगारुचा हा व्हिडिओ आहे. त्याला नीट चालताही येत नाही. हा व्हिडिओ भारतातील आहे. हा तस्करीचा प्रकार असून तो उघडकीस आला आहे.

Kangaroo in india : भारतातल्या जलपायगुडीत कांगारू? Video viral; काय आहे सत्य? वाचा सविस्तर
जलपायगुडीतला कांगारुंचा व्हायरल व्हिडओImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 04, 2022 | 8:30 AM
Share

Kangaroo in india : कांगारू… ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी. नाही ना? सस्तन प्राणी हा प्राणी आहे. हा ऑस्ट्रेलियाचा (Australia) राष्ट्रीय प्राणी (National animal) देखील आहे. कांगारू हे शाकाहारी (Vegetarian), मार्सुपियल प्राणी आहेत जे सस्तन प्राण्यांमध्ये त्यांच्या प्रकारात अद्वितीय आहेत. त्यांचे मागचे पाय लांब आणि पुढचे लहान आहेत, त्यामुळे ते उडी मारून हालचाल करतात. शेपटी लांब आणि जाड आहे, जी टोकाच्या दिशेने पातळ होते. असा कांगारू फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतो. त्याला कधी भारतात पाहिलंय का? अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कांगारुचा हा व्हिडिओ आहे. त्याला नीट चालताही येत नाही. हा व्हिडिओ भारतातील आहे. आता तुम्ही विचार कराल, ऑस्ट्रेलियातच आढळणारा प्राणी भारतात कसा? तर हा तस्करीचा प्रकार असून तो उघडकीस आला आहे.

पश्चिम बंगालमधला व्हिडिओ

पश्चिम बंगालमधील जलपायगुडी या ठिकाणी हा कांगारू दिसला. कुणीतरी व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ शेअर केला आणि नंतर तो व्हायरल झाला. याची सत्यता काय, असा सवाल व्हाट्सअॅपवरून विचारण्यात आला आहे. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत हे कांगारू आपल्याला दिसत आहे. याचे कारण त्याच्यासाठी ही जागा पूर्णपणे अनोळखी आहे. त्याचा परिवार त्याच्या जवळ नाही. ते सैरभैर झाले आहे. एका मोठ्या रस्त्यावर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा आणि आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

‘हा तर तस्करीचा भाग’

या व्हिडिओची माहिती देताना त्यांनी म्हटले आहे, की आपल्याकडील कोणत्याही प्राणीसंग्रहालयात कांगारू नाहीत. जर भारतात ते कुठे दिसले, तर तो एक तस्करीचा भाग असेल. दरम्यान, गेल्या महिन्यात अलीपूरद्वार येथे अशीच एक घटना घडली होती. यात दोघांना अटक करण्यात आली. तर त्यांच्याकडून एक कांगारू जप्त करण्यात आले.

आणखी वाचा :

Snake & Frog : …अन् धोकादायक सापाच्या तावडीतून सुटतो बेडून, लोकांनी हिंमतीला दिली दाद

Galapagos tortoise : ‘अभी तो मैं जवान हूँ’; 70व्या वर्षी बाप बनलेल्या ‘या’ कासवाची भलतीच रंगलीय चर्चा

Chinese robotic dog : भयाण शांतता… रस्त्यावर चिटपाखरुही नाही, अशा निर्मनुष्य रस्त्यांवर काय करतोय ‘हा’ कुत्रा?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.