AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोटोसाठी नदीच्या काठावर उभा राहिला नि गेला तोल…खवळलेल्या नदीत पुढे झाले काय?

सेल्फी काढताना एखाद्याने जीव गमावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः दऱ्या-खोऱ्यात, नदी किनारी, समुद्र किनाऱ्यावर हे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना समोर आली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

फोटोसाठी नदीच्या काठावर उभा राहिला नि गेला तोल...खवळलेल्या नदीत पुढे झाले काय?
फोटो काढतानाच त्याचा तोल गेलाImage Credit source: गुगल
| Updated on: Jul 08, 2025 | 1:57 PM
Share

सेल्फी काढताना दुर्घटना होऊन मरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सोशल मीडियाच्या जगात आपण काय करत आहोत, हे दाखवण्यासाठी अवघड ठिकाणी अनेकांना सेल्फीचा, फोटो काढण्याचा मोह सूटत नाहीत. रील्ससाठी पण अनेकांचा मोठा आटापिटा सुरू असतो, त्यासाठी ते स्वतःचा मुलांचा सुद्धा जीव धोक्यात टाकायला मागे पुढे पाहत नाहीत. पर्यटनस्थळी विशेष काळजी घेणे गरजेचे असते पण काही जणांना निष्काळजीपणा नडतो आणि मग जीव गमवावा लागतो.

त्याची पिकनिक ठरली अखेरची

कर्नाटकमधील म्हैसूरमधून हे वृत्त समोर येत आहे. येथे पिकनिक करण्यासाठी अनेक जण आले होते. येथे फोटो काढणे एका तरुणाला महागात पडले. तो फोटो काढण्यासाठी पुलाच्या कठड्यावर उभा राहिला. तेव्हा त्याचा तोल गेला आणि काही कळायच्या आत खाली खळाळणाऱ्या नदीच्या पाण्यात तो वाहून गेला. या घटनेशी संबंधित व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. अनेकांच्या अंगावर तो व्हिडिओ पाहून काटा आला. तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.

महेश असे या व्यक्तीचे नाव आहे. 36 वर्षीय महेश हा ऑटोरिक्षा चालक होता. तो श्रीरंगपट्टनम येथील सर्व धर्म आश्रम जवळील कृष्णराज सागर क्षेत्रात मित्रांसोबत मित्रांसोबत पिकनिक करण्यासाठी आला होता. येथे पिकनिक सुरू असताना फोटो सेशन सुरू झाले. त्यात महेश हा पुलाच्या कठड्याजवळ उभा होता. पुलाचा कठडा उंचीने कमी होता. त्यावर महेश उभा राहिला. पण अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली खळाळणाऱ्या नदीत पडला. पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यामुळे तो क्षणार्धात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याच्या मित्रांना काही कळण्याच्या आतच हा प्रकार घडला. त्यांनी आरडाओरड केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

या पुलाचे काम निर्माणाधीन होते. कठड्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नव्हते. त्यात पावसाळा आल्याने कामात अडथळे येत आहे. येथे पावसाळ्यात पर्यटक भेट द्यायला येतात. हा पूल कावेरी नदीवर बांधण्यात आलेला आहे. त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. या पुलाच्या कठड्यावर महेश उभा होता. त्याला फोटो काढायचा होता. पण त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. सध्या आपत्कालीन टीम त्यांचा शोध घेत आहे. या घटनेमुळे पर्यटक सध्या घाबरलेले आहेत. तर सुरक्षा यंत्रणेने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.