AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्याय द्या, न्याय द्या. चिफ जस्टीस न्याय द्या, मराठी -अमराठी वाद पेटलेला असतानाच उद्धव सेनेचे थेट सरन्यायाधीशांना साकडे

Agitation of Opposition at Vidhansabha : मीरा भाईंदरमध्ये मोर्चावरून वाद पेटला आहे. मराठी -अमराठी वाद वाढत असतानाच थोड्यावेळापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन छेडले. याप्रकरणात उद्धव सेनेने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच साकडे घातले आहे.

न्याय द्या, न्याय द्या. चिफ जस्टीस न्याय द्या, मराठी -अमराठी वाद पेटलेला असतानाच उद्धव सेनेचे थेट सरन्यायाधीशांना साकडे
विरोधकांसह उद्धव सेना आक्रमकImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 08, 2025 | 12:20 PM
Share

Leader of Opposition, Legislative Assembly : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चावरून वाद पेटला आहे. मोर्चेकरी आणि पोलिासांमध्ये झटापटी आणि शाब्दिक चकमक दिसून येत आहे. मोठ्या संख्येने या भागात कार्यकर्ते, पदाधिकारी जमा होत आहेत. मराठी-अमराठी वाद वाढत असतानाच इकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन छेडले आहे. उद्धव सेनेने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच साकडे घातले आहे. काय आहे अपडेट?

मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापले

मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. तर त्याविरोधात आज मनसेच्या मोर्चाचे नियोजन होते. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. मनसे नेत्यांची सकाळीच धरपकड केली. त्यानंतर ही मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघणार असा इशारा मनसेने दिला होता. तर या मोर्चात मराठी माणसाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर सकाळपासून या परिसरात मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पोलिसात बाचाबाची दिसली. तर त्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसभर वातावरण चिघळणार असल्याचे चिन्ह आहेत.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळा सरकार दरबारी आयोजीत करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने विधान भवनाच्या पायऱ्यांवरच आंदोलनाची हाक दिली. महाविकास आघाडीतील सर्व विरोधी पक्षनेते विधान भवनाच्या पायऱ्यांवरच आंदोलन करताना दिसून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव सेनेने पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन लक्षवेधी ठरले.

सरन्यायाधीशांना घातले साकडे

विधानसभेत सरकार विरोधी पक्षांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन छेडले आहे. खालच्या सभागृहात विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद अजून ही देण्यात आलेले नाही. त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे याविरोधात तक्रारीचा असा सूर विरोधकांनी आवळण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. पण अद्यापही सरकारने त्याविषयीची घोषणा केलेली नाही. आज सरन्यायाधीश यांचा सत्कार सोहळा होणार आहे. त्यांच्यासमोर कैफियत मांडण्यासाठी उद्धव सेनेसह सर्व विरोधी पक्षांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी न्याय द्या. न्याय द्या. चीफ जस्टीस न्याय द्या, असे साकडे त्यांना घालताना आमदार आदित्य ठाकरे दिसून आले.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.