दारात आलेल्या साधूला पाहून महिलेला धक्का; त्याच्या डोळ्यात पाहातच म्हणाली “प्राणनाथ”, नेमकं काय घडलं ?
मिर्झापूर येथील एका घराच्या दारात एक साधू येऊन उभा राहिला , त्याला पाहाताच त्या घराती महिलेला धक्काच बसला आणि तिच्या तोंडून फक्त 'प्राणनाथ' हा एकच शब्द बाहेर पडला. पण नक्की असं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे 27 वर्षांपासून बेपत्ता असलेला एक व्यक्ती अचानक घरी आल्यानं त्याच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाची लाट उसळली. प्रयागराज महाकुंभात स्नान करण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीला स्नान केल्यानंतर आपल्या कुटुंबीयांची आणि मित्रांची आठवण आली, तेव्हा तो आपल्या घरी परतला.
तब्बल 27 वर्षांनी नवरा परत
ही घटना कॉलर तहसीलच्या जमालपूरची आहे. या ठिकाणचे अमरनाथ गुप्ता 1998 मध्ये संन्यासाच्या भावनेने कुटुंबाला न सांगता जाता वृंदावनात गेले होते. घरच्यांना ते कुठे गेले याची फारशी माहिती नव्हती. बरेच वर्ष ते जेव्हा घरी परतले नाही तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला मृत मानले, परंतु 15 फेब्रुवारी 2025 रोजी ते घरी परत आले. घरी गेल्यावर त्यांना पाहून त्यांची पत्नी चंद्रावती अवाक् झाली. तसेच सर्व कुटुंबियांना आनंद झाला.
साधू वेषात आलेल्या पतीला ओळखणंही कठीण
संन्यासी जीवनात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून अमरनाथ बाबा ठेवले. वृंदावनात गेल्यावर त्यांनी भारतभरातील तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. अनेक धामला भेट दिल्या. अमरनाथ गुप्ता यांना घरची आठवण कशी आली असे विचारले असता त्यांनी सांगितले की, ते 13 जानेवारीला प्रयागराज महाकुंभात ते आले होते. कुंभस्नान केल्यानंतर त्यांना अचानक घरची आठवण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
महाकुंभात स्नान केलं अन् घरची आठवण झाली
अमरनाथ म्हणाले, 27 वर्षांनी घर पाहिलं. 1998 मध्ये घर सोडलं होतं. 27 वर्षांपासून बाहेर वृंदावन येथे होतो. 13 तारखेला महाकुंभ आला. तेव्हा आईची आठवण आली आणि तिला भेटण्यासाठी म्हणून घरी आलो. अमरनाथ 15 फेब्रुवारीच्या पहाटे जेव्हा त्यांच्या घरी आले तेव्हा कोणालाच त्यांची ओळख पटली नाही.
पुढचं आयुष्य साधू म्हणूनच जगणार
दरम्यान त्यांनी पुढे हेही म्हटलं की, “मी आता साधू झालो आहे. तसच जीवन जगत आहे. माझं संपूर्ण आयुष्य पुढे मी तसंच घालवणार आहे. मी आता पुन्हा माझ्या पुढच्या प्रवासाला जाईन” असं म्हणत ते फक्त एकदा घरच्यांना पाहायला आले होते असं त्यांना स्पष्ट केलं आहे.
आर्थिक स्थिती चांगली नव्हती म्हणून….
घर सोडण्याचे कारण सांगताना अमरनाथ म्हणाले, ‘माझी आर्थिक स्थिती चांगली नव्हती. तब्येतही बरी नव्हती. त्यावेळेस मी प्रचंड अस्वस्थ होतो. तेव्हा माझ्या मनात भजनाचे विचार येत होते. म्हणून मी वृंदावनात जाण्याचा निर्णय घेतला. कुरुक्षेत्र आणि राजस्थानमध्येही राहिलो. तेथे दीक्षा घेतली. महाकुंभ दरम्यान घरच्यांची आठवण आली म्हणून भेट घेण्यासाठी आलो. घर कोणीही विसरू शकत नाही.घरी येण्याची इच्छा वारंवार मी मारत राहिलो. पण अचानक प्रयागराजमध्ये आत्म्याचा आवाज आला की, ‘घरी जा’, म्हणून मी आलो. पण आता घरच्यांची भेट घेऊन ते पुन्हा जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
