ऐकावं ते नवलचं! कुत्रा चावला म्हशीला… म्हैस मेली… दूध पिणाऱ्यांना टेन्शन, इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात रांगाच रांगा… कुठे घडलं?

| Updated on: Nov 10, 2025 | 2:53 PM

भरूच जिल्ह्यातील जंबुसरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. येथे एका पशुपालकाच्या म्हशीला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला आणि म्हशीची तब्येत बिघडली. त्यानंतर ती मरण पावली. मात्र, त्यानंतर जे घडलं...

जगात काहीही घडू शकतं… कधीकधी अशा अतरंगी, विचित्र घटना ऐकायला मिळतात की त्यानंतर हसावं की काय करावं असाच प्रश्न पडतो ! गुजरातच्या भरूच जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे.त्या गावात एका म्हशीला कुत्रा चावला, तिची तब्येत बिघडली आणि रेबीजमुळे मृत्यू झाला. मात्र त्यानंतर त्या म्हशीचे दूध प्यायलेल्या लोकांनी लसीकरणासाठी रुग्णालयात धाव घेतली. कारण सर्वांना अशी भीती वाटत होती की त्यांनाही रेबीज होऊ शकतो आणि याच भीतीमुळे हे सर्व लोक रुग्णालयात धावले.

रेबीजमुळे म्हशीचा मृत्यू, दूध पिणाऱ्यांना टेन्शन

भरूच जिल्ह्यातील जंबुसरमध्ये ही घटना घडल्याचे उघडकीस आली आहे. तेथे एका पशुपालकाच्या म्हशीला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला आणि म्हशीची तब्येत बिघडली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या दरम्यान, म्हशीला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला खबरदारी म्हणून इंजेक्शन घ्यावे लागले.

35 जणांनी घेतली लस

आतापर्यंत आपण कुत्रा चावल्यानंतर लोकांना व्हॅक्सीनेशन घेतल्याचे ऐकले असेल , पण जांबुसरमध्ये तर त्या म्हशीचे दूध प्यायल्यानंतर अनेक लोकांनी रेबीजची लस घेण्यासाठी गर्दी केली होती. कारण ज्या म्हशीचे दूध लोक प्यायले होते तिला कुत्रा चावल्याने रेबीज झाला होता आणि त्यामुळेच ती म्हैसही मेली. आपण ज्या म्हशीचे दूध प्यायलो तिचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याचे कळल्यावर 35 पेक्षा जास्त लोकांनी व्हॅक्सीनेशनसाठी आरोग्य केंद्रात धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी या म्हशीला एका कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे म्हशीचाही रेबीजने मृत्यू झाला. परंतु आता ते कळल्यावर, आपल्यालाही रेबीज होऊ नये या भीतीपायी 35 जण लसीकरण करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

रेबीजची लक्षणे नसल्यास लसीचे काही दुष्परिणाम असतात का ?

मिळालेल्या माहितीनुसार, जर रेबीजची लक्षणे आढळल्याचा संशय असेल, (जसे या प्रकरणात घडले) जर म्हशीला रेबीज झाला असेल, तर दूध पिणाऱ्या माणसांनाही तो होऊ शकतो, अशी शंका असल्यास रक्त तपासणी केली जाते आणि त्यानंतर डॉक्टरांकडून लस दिली जाते. या केसमध्ये सुद्धा बुस्टरडोस देण्यात आला. तथापि, डॉक्टरांनी रेबीजची लस दिली की नाही हे अद्याप कळलेले नाही.

Published on: Nov 10, 2025 02:53 PM