बाथरूममध्ये भयंकर घडलं, अचानक सापडली कवटी…सोबतच्या चिठ्ठीत थक्क करणारा मेसेज, प्रकरण काय?
एका जोडप्याने 80 वर्षे जुने घर खरेदी केले. त्यानंतर त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू केले. बाथरूमच्या नूतनीकरणादरम्यान भिंतीच्या आत एक कवटी सापडली. ती पाहून सर्वांचे धाबे दणाणले. त्यासोबत एक चिठ्ठीही होती. त्या चिठ्ठीत काय लिहिले होते आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे, जाणून घ्या.

एका जोडप्याने राहण्यासाठी 80 वर्ष जुने एक घर खरेदी केले होते. हा बंगला जवळपास 1940 मध्ये बांधलेला होता. हा बंगला खरेदी करणाऱ्या जोडप्याने नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा त्यांनी बाथरुमचे नूतनीकरण करण्यास सुरुवात केली तेव्हा बाथरुमच्या भींतीमागे त्यांना कवटी दिसली. संपूर्ण सापळा असू शकतो म्हणून त्यांनी पूर्ण भींत फोडली. त्यानंतर त्यांना जे दिसले ते फार अजब होते. त्यांना एक चिठ्ठी देखील सापडली.
नेमकं काय आहे?
मिररच्या अहवालानुसार, कॅनडातील विनिपेग येथे एका जोडप्याला त्यांच्या नव्या खरेदी केलेल्या घराच्या भिंतीत एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. जेव्हा ते बाथरूमचे नूतनीकरण करत होते, तेव्हा भिंतीत एक कवटी दिसली. ते पाहून जोडप्याचे धाबे दणाणले. त्यानंतर भिंती फोडण्यात आली. त्यानंतर त्यांना एक संपूर्ण सापळा तेथे दिसला. सुरुवातीला ते घाबरले. पण काही क्षणांनंतर जेव्हा त्यांनी नीट पाहिले, तेव्हा त्यांना हसू आले. जोडप्याने त्या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वाचा: 19-20 वर्षाच्या मुलींना माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव
View this post on Instagram
व्हिडीओच्या सुरुवातीला ती भिंत दाखवण्यात आली आहे, जी त्यांनी तोडली आहे. त्या भींतीवर एक छोटेसे भोक होते, ज्यातून एक भयानक कवटी दिसत होती. त्यानंतर त्या व्यक्तीने काळजीपूर्वक उरलेली भिंत फोडली, जेणेकरून संपूर्ण सांगाडा दिसेल. जेव्हा भिंतीचा बाह्य थर पूर्णपणे काढला गेला, तेव्हा आत जे काही होते ते पाहून त्यांना हसू अनावर झाले. कारण तो सापळा जीन्स घातलेला होता. त्याने एक बटण असलेला शर्ट घातला होता आणि कमरेला काळा पट्टा लावला होता. त्याच्या शर्टाच्या खिशात एक चिठ्ठी ठेवलेली होती. जोडप्याने ती चिठ्ठी ताबडतोब काढली आणि वाचू लागले. त्यात लिहिले होते – हा, हा, हा, मी तुम्हाला घाबरवले का? जेसन लेन, 2013.
खिशात सापडली एक चिठ्ठी
ही एक चिठ्ठी होती, जी सांगाड्याला घातलेल्या कपड्यांमध्ये ठेवली होती. हे सर्व पाहून कॅमेऱ्यामागून एका महिलेने ओरडून सांगितले, “हे तर खूप मजेदार आहे.” आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये घरमालक कैली एलिसन यांनी नेमकं काय आहे याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, जेव्हा मी माझ्या विनिपेग येथील घराचे (जे 1941 मध्ये बांधले गेले होते) बाथरूमचे नूतनीकरण करत होतो, तेव्हा आम्हाला कळले की मागील मालकाने भिंतीत एक प्लास्टिकचा सापळा लपवला होता. त्यासोबत एक चिठ्ठीही होती. सापळ्याच्या खिशात सापडलेल्या यूएसबी ड्राइव्हमध्ये होती घराची संपूर्ण कहाणी.
घराची पूर्ण कहाणी
त्यांनी सांगितले की, त्यांना खिशात एक यूएसबी ड्राइव्हही सापडली. त्यात मागील मालकाने घराची कहाणी शेअर केली होती. त्यात घर नूतनीकरणापूर्वी कसे दिसायचे, तसेच ते त्यांच्या पणजोबांकडे असताना कसे दिसायचे, याबाबत माहिती होती. त्यांनी सांगितले की, मी सापळा पुन्हा भिंतीवर लावण्याची योजना आखली आहे. त्या यूएसबी ड्राइव्हमध्ये माझे फोटो आणि कहाणीही आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर अनेकांनी आपली मते मांडली आहेत आणि दावा केला की हा एक खूप चांगला प्रँक होता.
