Video: मांडीवर साप येऊन बसला, चावणार तितक्यात व्यक्तीने समजदारी दाखवली, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक साप येऊन त्या व्यक्तीच्या मांडीवर बसतो. त्याच्या मांडीवर साप येताच, तो अजिबात हलत नाही.

Video: मांडीवर साप येऊन बसला, चावणार तितक्यात व्यक्तीने समजदारी दाखवली, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
मांडीवर साप आल्यानंतर पाहा काय होतं.

सोशल मीडियावर दररोज अनेक प्राण्यांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही खूप गोंडस असतात तर काही आश्चर्यकारक आहेत. आता सापांबद्दल बोलायचं झालं तर नाव ऐकताच सगळे घाबरतात. सापांची भीती प्रत्येकाच्या मनात नक्कीच असते. जरा कल्पना करा की, एखाद्याच्या मांडीवर साप बसला तर त्याचे काय होईल? होय, आता इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या मांडीवर एक साप बसला आहे आणि ती व्यक्ती मोठी समजूतदारपणा दाखवून त्याचा जीव वाचवते. (snake Video Snake was sitting in the lap but man showed cleverness and saved his life amazing life saving video)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक साप येऊन त्या व्यक्तीच्या मांडीवर बसतो. त्याच्या मांडीवर साप येताच, तो अजिबात हलत नाही. पण शेवटी तो एका लाकडाने सापाला स्पर्श करतो, त्यानंतर साप एका बाजूला वळतो आणि त्या व्यक्तीच्या मागे लपतो. साप तिथून बाजूला जातात हा व्यक्ती ताबडतोब उठून आपला जीव वाचवतो.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल की, थोड्याशा निष्काळजीपणामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेला असता, पण त्या व्यक्तीच्या समजूतदारपणानेच त्याचा जीव वाचू शकतो.

व्हिडिओ पाहा

हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. @Jamie24272184 नावाच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. लोकांच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना एका युजरने कमेंट केली की, ‘हा खूप भीतीदायक व्हिडिओ आहे.’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘तुम्ही अनेकदा सापाच्या हल्ल्यातून वाचण्याइतके भाग्यवान नसता.’ तर काही लोकांना हे म्हणायचे होते की देवाचे आभार. की या व्यक्तीचे प्राण वाचले.

हेही पाहा:

Video: एकामागोमाग एक तोंडातून पेटवून रॉकेट हवेत, लोक म्हणाले, ही तर रजनीकांत स्टाईल दिवाळी!

गरीबीत जगण्याचा संघर्ष आणि स्वत:ला विकण्याची वेळ, नायजेरियातील तरुणाची किंमत 37 लाख रुपये!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI