AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे देवा! डेन्टिस्टची फी परवडली नाही म्हणून महिलेने स्वत:च 11 दात उपटले; नंतर काय हाल झाले पाहा!

दातांची काहीही समस्या निर्माण झाल्यावर आपण सर्वात अगोदर डेन्टिस्टकडे जातो. मात्र, लंडनमध्ये राहणाऱ्या एका 42 वर्षाच्या महिलेने दातांची समस्या निर्माण झाल्यावर डाॅक्टरांकडे न जाता स्वत: च आपले 11 दात घरचे-घरी उपटले. हे ऐकल्यानंतर धक्का बसला ना...होय पण हे खरं आहे.

अरे देवा! डेन्टिस्टची फी परवडली नाही म्हणून महिलेने स्वत:च 11 दात उपटले; नंतर काय हाल झाले पाहा!
दातदुखी
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 12:16 PM
Share

दिल्ली : दातांची काहीही समस्या निर्माण झाल्यावर आपण सर्वात अगोदर डेन्टिस्टकडे जातो. मात्र, लंडनमध्ये राहणाऱ्या एका 42 वर्षाच्या महिलेने दातांची समस्या निर्माण झाल्यावर डाॅक्टरांकडे न जाता स्वत: च आपले 11 दात घरचे-घरी उपटले. हे ऐकल्यानंतर धक्का बसला ना…होय पण हे खरं आहे. या महिलेचे नाव डेनिएल वाट्स असे आहे.

मिरर यूके याच्या रिपोर्टनुसार महिलेचे दात अचानक हालत होते आणि दुखत होते. त्यानंतर या महिलेने तिच्या घराच्या परिसरामध्ये असलेले सरकारी दवाखाने गाठले. मात्र, तिथे डेन्टिस्ट नसल्याचे तिला समजले. खासगी दवाखाण्यात जाण्यासाठी तिच्याकडे पैसे देखील नव्हते. मग त्यानंतर तिने एक-एक करून आपले 11 दात घरीच उपटले.

विशेष म्हणजे ही महिला गेल्या तीन वर्षांपासून आपले दात उपटत आहे. या सर्व प्रकाराबद्दल डेनिएल वाट्स म्हणते की, माझ्याकडे डेन्टिस्टकडे जाण्यासाठी पैसे नव्हते. मग मी काय करणार मी हतबल झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून मी हसायला देखील विसरले आहे. या सर्व प्रकरणामुळे माझा आत्मविश्वास देखील संपला आहे. दातदुखीच्या होणाऱ्या त्रासामुळे मला गेल्या तीन वर्षांपासून दररोज पेनकिलर घ्यावी लागते.

डेनिएल वाट्स पुढे म्हणाल्या की, हे सर्व माझ्याकडे खूप अवघड होते. पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सरकारी दवाखाण्यात गेल्या सहा वर्षांपासून डेन्टिस्ट नव्हते. मी अजू- बाजूला विचारणा केली मात्र, सर्वजण खासगी दवाखाण्याची माहीती देत होते. माझ्याकडे खासगी दवाखाण्यात जाण्याऐवढे पैसे नव्हते. त्यामुळे मी तीन वर्षामध्ये स्वत: चे अकरा दात उपटले.

संबंधित बातम्या : 

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

सोनाराच्या दुकानात जोडप्याची चोरी, कुत्र्याची शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल वाह वाह!

Viral video | जंगलात आईपासून विभक्त झाले हत्तीचे पिल्लू, इकडे-तिकडे पळून शोधत होता आईला

(Unable to afford the dentist’s fees, the woman pulled out 11 teeth herself)

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.