Video : या दिव्यांग व्यक्तीच्या इच्छाशक्तीला जगाचा सलाम, हा व्हायरल व्हिडीओ जिंकेल तुमचंही मन

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका दिव्यांग व्यक्तीचा आहे. या व्यक्तीचा एक पाय नाही, तरीही तो एका काठीच्या आधारे फर्त चालतच नाही तर 'पळतो'ही! या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या वक्तीचा एक पाय नाही. तरीही तो एका काठीच्या मदतीने आरामात आपली सायकल चालवत आहे.

Video : या दिव्यांग व्यक्तीच्या इच्छाशक्तीला जगाचा सलाम, हा व्हायरल व्हिडीओ जिंकेल तुमचंही मन
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 18, 2021 | 11:14 PM

मुंबई : सोशल मीडियाच्या (Social Media) या जमान्यात आता कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. प्रत्येक गोष्टी कधी ना कधी व्हायरल होत असते. सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडीओ आता उपलब्ध होतात. तुम्हाला कोणत्याही विषयावरील व्हिडीओ पाहायचा असेल, त्या नावाने फक्त तो सर्च करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ढिगाने व्हिडिओ पाहायला मिळतील. फेसबुक (facebook) पासून इन्स्टाग्राम (Instagram) आणि ट्वीटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तर व्हायरल व्हिडीओचा खजाना मानलं जातं. इथे व्हायरल होणारे व्हिडीओ कधी मनोरंजनाचं साधन ठरतं तर कधी तेच व्हिडीओ तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही भावनिक होऊ शकता, सोबतच त्या व्यक्तीच्या इच्छशक्तीचं कौतुकही कराल.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका दिव्यांग व्यक्तीचा आहे. या व्यक्तीचा एक पाय नाही, तरीही तो एका काठीच्या आधारे फर्त चालतच नाही तर ‘पळतो’ही! या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या वक्तीचा एक पाय नाही. तरीही तो एका काठीच्या मदतीने आरामात आपली सायकल चालवत आहे. ही त्या व्यक्तीची इच्छाशक्ती आहे की त्याने आपल्या आयुष्यात हार मानली नाही. त्याची हीच इच्छाशक्ती अनेकांना या व्हिडीओच्या माध्यमातून प्रेरणादायी ठरत आहे.

आयपीएस अधिकाऱ्याकडून व्हिडीओ ट्वीट

व्हिडीओमध्ये दिसणारा हा दिव्यांग व्यक्ती कोण आहे, कुठे आहे, त्याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ आयपीएस दिपांशू काबरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसंच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘हौसला ऐसा हो तो कोई बाधा आपको आगे बढ़ने से नहीं रोक सकती’.

व्हिडीओला हजारो लाईक्स, कमेंट्स

हा व्हिडीओ आतापर्यंत 10 हजारापेक्षा अधिकवेळा पाहिला गेला आहे. तर 1 हजार 300 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तर अनेक लोकांनी हा व्हिडीओवर अनेकांनी चांगल्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, ‘आपल्या देशाला उगाच महान म्हणत नाहीत. या मातीत नक्कीच काही खास आहे’. तर एकाने लिहिलं आहे की, देवही त्याचीच साथ देतो, ज्या व्यक्तीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते. तर एका व्यक्तीने कमेंट केली आहे की, हे खरं आहे की देव दिव्यांग व्यक्तींमध्ये अनोखे गुण देतो.

इतर बातम्या :

ओमिक्रॉनचा 89 देशांत शिरकाव, ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत 93 हजार कोरोनाबाधित!

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें