Viral Video : गुजरातमध्ये तुफान पाऊस, पण झोमॅटो बॉयची कमाल, जीव धोक्यात घालून…
floods in Gujarat viral video: व्हिडिओच्या पोस्टवर पूरग्रस्त भागातून जेवणाची ऑर्डर करणाऱ्या त्या व्यक्तीवर टीका केली आहे. बऱ्याच लोकांनी असेही म्हटले की, झोमॅटोने पूर असलेल्या भागात ऑर्डर वितरण करणे थांबवावे. कारण यामुळे डिलेव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो.
floods in Gujarat viral video: गुजरातमध्ये गेली तीन, चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झाली आहे. अनेक भाग पाण्यात बुडाले आहे. लष्कराला मदत अन् बचावकार्यासाठी बोलवले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. झोमॅटो बॉयच्या या व्हिडिओचे खूप कौतूक होत आहे. गुडघाभर पाण्यातून झोमॅटो बॉय डिलेव्हरी करताना व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. एका इमारतीच्या छतावरुन हा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.
काय आहे त्या व्हिडिओत
अहमदाबादमधील झोमॅटो बॉयचा व्हिडिओ नीतू खंडेलवाल या युजरने एक्सवर शेअर केला आहे. फक्त 16 सेंकदाचा हा व्हिडिओ आहे. परंतु त्या व्हिडिओमधून त्या डिलेव्हरी बॉयचे कामाच्या प्रति समर्पण दिसत आहे. या व्हिडिओने लाखो युजर प्रभावित झाले आहे. परंतु झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयलसुद्धा प्रभावी झाले आहेत. युजरकडून त्या व्यक्तीला पुरस्कार देण्याची मागणी होत आहे.
एका युजरने व्हिडिओ पाहून म्हटले की, हा डिलेव्हरी बॉय पारितोषिकाचा नाही तर पुरस्काराचा हकदार आहे. दुसरा युजरने म्हटले की, विपरीत परिस्थितीत खच्चून न जाता कामाच्या प्रति त्याचे समर्पण दिसत आहे. काही युजरने या प्रकाराबद्दल झोमॅटोवर नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे.
Zomato delivering food in Ahmedabad amidst extremely heavy rains.
I request @deepigoyal to find this hardworking delivery person and appropriately reward him for his dedication and determination. #Zomato #AhmedabadRains #GujaratRains pic.twitter.com/RQ5TsbpTSL
— Neetu Khandelwal (@T_Investor_) August 28, 2024
जीव धोक्यात घालण्याच्या या प्रकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्या डिलेव्हरी बॉयला काही झाले असते तर कंपनीने हात झटकले असते. एका युजरने म्हटले आहे की, अतिवृष्टी असलेल्या भागात सेवा सुरु ठेवल्यामुळे झोमॅटोवर खटला दाखल केला पाहिजे. काही जणांनी कंपनीने सुरक्षा मानके वाढवण्याचा सल्ला दिला आहे.
जेवणाची ऑर्डर देणाऱ्यावर टीका
व्हिडिओच्या पोस्टवर पूरग्रस्त भागातून जेवणाची ऑर्डर करणाऱ्या त्या व्यक्तीवर टीका केली आहे. बऱ्याच लोकांनी असेही म्हटले की, झोमॅटोने पूर असलेल्या भागात ऑर्डर वितरण करणे थांबवावे. कारण यामुळे डिलेव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो.
#ZOMATO delivering in Ahmedabad amidst extremely heavy rains!! #ahmedabadrains #Gujarat pic.twitter.com/JWIvvhIDtP
— Vikunj Shah (@vikunj1) August 26, 2024
का सुरु आहे मुसळधार पाऊस
गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ भागात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, या प्रदेशात जमिनीवर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरु आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रात जाऊन शांत होणार आहे. गेल्या चार दिवसांत गुजरातमध्ये पावसामुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील पूरग्रस्त भागातून 32,000 हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सुमारे 1,200 लोकांची सुटका करण्यात आली आहे.