Video: NASA ने दाखवलं ब्रह्मांडातील भूत, हॅलोविनच्या निमित्ताने भयानक व्हिडीओ पोस्ट, पाहा नासाचा हॅलोविन व्हिडीओ
हॅलोविनच्या निमित्ताने, नासाने अंतराळ घडामोडीपासून दूर असलेला एक क्रिएटिव्ह व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत यूएस स्पेस एजन्सीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅप्पी हॅलोवीन...

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अंतराळातील अनेक धक्कादायक गोष्टी पोस्ट करत असते. पण हॅलोविनच्या (Halloween) निमित्ताने या अमेरिकन स्पेस एजन्सीने काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नासाच्या या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करण्याऐवजी लोक त्याची खिल्ली उडवू लागले आहेत. खरं पाहायला गेलं तर, नासाच्या व्हिडिओ पोस्टमध्ये असं काही दाखवलं गेलं आहे, जे पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत कि, असं दिसतं की हबलने दारू पिण्यास सुरुवात केली आहे. (Viral Space Video Nasa shares scary spiderweb in space Halloween Fest Nasa post Video and says Watch if you dare)
हॅलोविनच्या निमित्ताने, नासाने अंतराळ घडामोडीपासून दूर असलेला एक क्रिएटिव्ह व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत यूएस स्पेस एजन्सीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅप्पी हॅलोवीन… हबलने ब्रह्मांडात एक अतिशय भितीदायक गोष्ट पाहिली आहे, जी अंतराळात कोळ्याच्या जाळ्यासारखी दिसते.’ यासोबतच नासाने लिहलं आहे की. , हिम्मत असेल तरच बघा हे बघा. 3 दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 44 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
नासाच्या व्हिडिओची सुरुवात हबल टेलिस्कोपने होते. ज्यावर मजकूर लिहिला आहे की, हबलला अंतराळात काही भयानक गोष्ट दिसली आहे. यानंतर अंतराळातील एक दृश्य दिसतं. मग अचानक हॅलोवीन भोपळ्याच्या भोपळ्याचा येतो. यानंतर, अंतराळात एक मोठं कोळ्याचे जाळे दाखवले जातं. एकूणच नासाने हॅलोविनच्या निमित्ताने एक क्रिएटिव्ह पोस्ट शेअर केली आहे. पण लोकांना ते खूपच हास्यास्पद वाटली आहे.
व्हिडीओ पाहा:
View this post on Instagram
नासाच्या या क्लिकबेट अॅप्रोचनंतर लोक हा व्हिडिओ नक्कीच पाहतील हे उघड आहे. नेमकं तेच झालं. मात्र, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी नासाची खिल्ली उडवणं सुरु केलं. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘हे नासाचे अधिकृत खातं आहे की नाही, हे मला दोनदा तपासावं लागलं.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘नासाच्या हबलने खूप दारु पिणं सुरू केले आहे असं दिसते. त्याचवेळी अजून एखा युजरने हा व्हिडिओ कोणी एडिट केला आहे, असा प्रश्नही विचारला आहे. मात्र, अनेकांनी नासाच्या या सेन्स ऑफ ह्युमरचे कौतुकही केले आहे.
हेही पाहा:
