Video: वॉटरपार्कमध्ये करत होता हिरोपंती, पाण्याच्या एकाच लाटेने जागा दाखवली

एक मजेदार व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस वॉटर पार्कमध्ये स्टाईलने उभा असलेला दिसत आहे. त्यानंतर जे काही घडले ते पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की, या भावाची सगळी हिरोपंती निघून गेली.

Video: वॉटरपार्कमध्ये करत होता हिरोपंती, पाण्याच्या एकाच लाटेने जागा दाखवली
वॉटरपार्कमध्ये मस्ती करणं महागात

सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते, तर काही व्हिडिओ इतके मजेदार असतात की हसू आवरता येत नाही. असाच एक मजेदार व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस वॉटर पार्कमध्ये स्टाईलने उभा असलेला दिसत आहे. त्यानंतर जे काही घडले ते पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल की, या भावाची सगळी हिरोपंती निघून गेली. (Waterpark funny video goes viral when a boy hit by a wave)

व्हायरल झालेला व्हिडिओ वॉटर पार्कमधला आहे. ज्यात काही लोक रोलर कोस्टर राइडचा आनंद घेताना दिसत आहेत. त्याच वेळी, रोलर कोस्टरच्या मार्गाच्या शेवटी, काही लोक रेनकोट घालून उभे आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक तरुण चित्रपटाच्या शैलीमध्ये हात पसरून मागे उभा आहे. असे दिसते की, त्याला रोलर कोस्टरमधून उडणारं पाणी स्वत:च्या अंगावर घ्यायचं आहे. पण कदाचित या तरुणाला कल्पना नव्हती की, त्याचा अनुभव कडू असणार आहे.

चला हा व्हिडीओ पाहू.

मार्गाच्या शेवटी, हाय-स्पीड रोलर कोस्टरमुळे पाण्याची लाट येते, जी लोकांना रेनकोटमध्ये भिजवल्यानंतर, मागे उभ्या असलेल्या तरुणाशी धडकते. पण त्यानंतर जे काही होईल, त्या तरुणालाही याची कल्पना नव्हती. पाण्याच्या धक्क्यामुळे ते खूप वेगाने रेलिंगवर आदळतो आणि इथेच व्हिडिओ संपतो.

काही सेकंदांचा हा व्हिडिओ ट्विटरवर red fred035schultz नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ट्विटरवर शेअर केल्यापासून ते आतापर्यंत 11 हजार वेळा पाहिले गेला आहे. तर शेकडो लोकांना तो आवडला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यावर सतत कमेंट्स करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे.

हेही पाहा:

Video: चिमुरड्याने कॅन्सरला हरवलं, बापाच्या आनंदाला पारावार उरला नाही, बाप-मुलाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Video: तहानलेली खारुताई जेव्हा प्रवाशांकडे हात जोडून पाणी मागते, प्राण्यांना किती कळतं पाहा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI