Video: चिमुरड्याने कॅन्सरला हरवलं, बापाच्या आनंदाला पारावार उरला नाही, बाप-मुलाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

जेव्हा वडिलांना कळले की आपल्या मुलाने कर्करोगाला हरवले आहे, तेव्हा त्याच्या आनंदाला सीमा राहिली नाही. आनंदाने त्यांनी मुलाला हातात घेऊन नाचायला सुरुवात केली.

Video: चिमुरड्याने कॅन्सरला हरवलं, बापाच्या आनंदाला पारावार उरला नाही, बाप-मुलाच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल
बाप लेकाचा भन्नाट डान्स

जरी आई आणि मुलाचे नाते जगातील सर्वात सुंदर मानलं जात असली तरी वडील आणि मुलाची जोडी देखील हीट असते. जगातील प्रत्येक वडिलांना आपल्या मुलांनी सतत हसत रहावे आणि खेळत राहावे असे वाटते. पण नशिबावर कुणाचा जोर चालत असतो. सध्या असाच एक अतिशय गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वडिलांचा आनंद पाहण्यासारखा आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या मुलाला हातात घेऊन नाचत आपला आनंद व्यक्त करत आहे. ( Little boy was declared cancer free his father reaction goes viral on social media)

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक बाप मुलाची जोडी दिसत आहे. माहितीनुसार, जेव्हा वडिलांना कळले की आपल्या मुलाने कर्करोगाला हरवले आहे, तेव्हा त्याच्या आनंदाला सीमा राहिली नाही. आनंदाने त्यांनी मुलाला हातात घेऊन नाचायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये, पाहिले जाऊ शकते की वडील, मुलाला हातात धरून एका गाण्यावर नाचत आहेत. जेव्हा त्याने मुलाला खाली आणलं, तेव्हा त्याने नाचायलाही सुरुवात केली.

व्हिडीओ पाहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Kennith Allen Thomas (@kennyclutch_)

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये वडील आणि मुलगा एकाच रंगाचा ड्रेस परिधान केलेले दिसत आहेत. केनेथ अॅलन थॉमस नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता, जो आता खूप व्हायरल होत आहे. हे जवळजवळ 2 लाख वेळा पाहिले गेले आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- “महान नेत्यांना आत्मविश्वास कसा निर्माण करायचा हे माहित असतं, जेणेकरुन यश मिळते.” या व्हिडिओवर युजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका युजर्सने लिहिले – “धन्यवाद येशू” आणि दुसऱ्याने लिहले – “देव सर्वांना आशीर्वाद दे.” याशिवाय अनेक लोकांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पिता-पुत्रांच्या जोडीचे कौतुक केले.

हेही पाहा:

Video: प्रशिक्षकालाच माकडाचा जोरदार रपाटा, व्हिडीओ पाहून नेटकरी हसून लोटपोट

Steam Engine Tractor: एकाच वेळी 44 फाळके ओढून विश्वविक्रम, पाहा वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या ट्रॅक्टरची अफाट क्षमता

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI