Aadhaar Card Update : मोबाईल क्रमांक बदलला, आधार कार्डसोबत असा जोडा नवीन क्रमांक

Aadhaar Card Update : आधार कार्डसोबत असा बदलावा तुमचा मोबाईल क्रमांक

Aadhaar Card Update : मोबाईल क्रमांक बदलला, आधार कार्डसोबत असा जोडा नवीन क्रमांक
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 5:36 PM

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhaar Card) हा एक महत्वपूर्ण दस्तावेज आहे. विविध सरकारी योजनांला लाभ घेण्यापासून तर अनेक ठिकाणी ओळख दाखविण्यापर्यंत या कार्डचा आता वापर करण्यात येतो. सिम कार्ड खरेदी असो, बँकेत नवीन खाते उघडणे असो, शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर करण्यात येतो. आधार कार्डसंबंधित अनेक सेवा ऑनलाईन (Online Services) मिळतात. पण त्यासाठी आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे. तुम्ही आधार कार्डशी लिंक्ड केलेला मोबाईल क्रमांक विसरले, तो क्रमांक बदलला असल्यास तुम्हाला नवीन मोबाईल क्रमांक (Mobile Number Update) जोडणे आवश्यक आहे.

आधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक बंद झाला. तो क्रमांक आठवत नसेल. मोबाईल क्रमांक हरवला असेल तर नवीन मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडता येतो. याविषयीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नवीन मोबाईल क्रमांक अपडेट करता येईल.

त्यासाठी तुम्हाला अगोदर UIDAI चे अधिकृत संकेतस्थळ अथवा My Aadhaar वर लॉग इन करावे लागेल. या ठिकाणी व्हेरिफाय आधारवर लिंक करा. आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाका. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा

पुढील पेजवर आधार कार्ड जोडणीची माहिती मिळेल. आधार कार्डसोबत जोडलेल्या मोबाईल क्रमांकाची शेवटची चार आकडे दिसतील. त्याद्वारे आधार कार्डच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाची माहिती मिळेल. हा क्रमांक हटवून नवीन मोबाईल क्रमांक जोडणीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

सर्वात अगोदर UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. My Aadhaar वर लॉग इन करावे लागेल. याठिकाणी Aadhaar Services वर क्लिक करा. त्यानंतर Update Your Mobile Number या लिंकवर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर नवीन मोबाईल क्रमांक नोंदविल्या जाईल.

सर्वात अगोदर नवीन मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका आणि OTP पर्याय निवडा. मोबाईल क्रमांक व्हेरिफिकेशनसाठी UIDAI तुमच्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवेल. कोड सबमिट करा. मोबाईल क्रमांक आधारशी जोडल्या जाईल.

यापूर्वी आधार कार्डशी जोडलेला तुमचा मोबाील क्रमांक बंद झाला, हरवला तर नवीन मोबाईल क्रमांक जोडता येतो. त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. त्याठिकाणी मूळ आधार कार्ड आणि इतर एखादे ओळखपत्र दाखवावे लागेल.

आधार कार्ड अपडेट वा करेक्शन फॉर्म भरुन नवीन मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्याची विनंती करता येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर नवीन मोबाईल क्रमांक समाविष्ट करता येईल. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नवीन क्रमांकावर आधार कार्डसंबंधीची कामे पूर्ण करता येतील.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.