AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‍ॅमेझॉनचे छोट्या व्यावसायिकांना बळ; ‘स्मॉल बिझिनेस डे’मध्ये तुम्ही व्हा सहभागी

या तीन दिवसांच्या ऑनलाईन विक्री कार्यक्रमाचे उद्दीष्ट म्हणजे उत्पादनांची एक अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण निवड यांच्यादरम्यान ग्राहकांची मागणी निर्माण करणे. (Amazon's power to small businesses; Participate in Small Business Day)

अ‍ॅमेझॉनचे छोट्या व्यावसायिकांना बळ; 'स्मॉल बिझिनेस डे'मध्ये तुम्ही व्हा सहभागी
अ‍ॅमेझॉनचे छोट्या व्यावसायिकांना बळ; 'स्मॉल बिझिनेस डे'मध्ये तुम्ही व्हा सहभागी
| Updated on: Jul 03, 2021 | 11:26 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. या महामारीचा सर्वात मोठा परिणाम झालेल्या छोट्या व्यवसायांना पुन्हा उभे राहणे मोठे आव्हान बनले आहे. या व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आता अ‍ॅमेझॉन इंडियाने अ‍ॅमेझॉन स्मॉल बिझिनेस डे (एसबीडी) (Amazon Small Business Days (SBD) 2021) जाहीर केले आहे. हा कार्यक्रम 2 जुलैच्या मध्यरात्रीपासून 4 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होईल. या तीन दिवसांच्या ऑनलाईन विक्री कार्यक्रमाचे उद्दीष्ट म्हणजे उत्पादनांची एक अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण निवड यांच्यादरम्यान ग्राहकांची मागणी निर्माण करणे. अशी उत्पादने लाखो विक्रेते, उत्पादक, स्टार्ट-अप्स आणि ब्रँड, महिला उद्योजक, कारागीर आणि विणकर तसेच स्थानिक दुकानदारांकडून सादर केली जातात. (Amazon’s power to small businesses; Participate in Small Business Day)

लाखो छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्याची संधी

तुम्ही या तीन दिवसांच्या अ‍ॅमेझॉन इंडिया विक्री कार्यक्रमादरम्यान खरेदी केल्यास तुमच्याकडे व्यवहार आणि ऑफर शोधण्याची, वस्तू खरेदी करण्याची आणि लाखो छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्याची संधी असेल. विक्री कार्यक्रमात रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी उत्पादने, मान्सूनमध्ये अर्थात पावसाळ्यात आवश्यक असलेल्या वस्तू, होम फिटनेस अर्थात आपल्या घरामध्ये तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे, देशाच्या विविध भागांतील प्रसिद्ध हस्तकला, ​​बाजारातील विशेष थीम असलेली स्टोअर्स इ.

10% पर्यंत कॅशबॅकदेखील मिळवू शकता

जर तुम्हाला घरी एखाद्या वस्तूची गरज असेल, तुम्ही एखादा भिन्न खाद्यपदार्थ किंवा वारसा किंवा हातमाग वस्तू शोधत असाल तर स्मॉल बिझिनेस डे 2021 मध्ये वेगवेगळ्या राज्यांतील विणकरांना एक स्थान आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या कार्यक्रमात सहभागी व्हा. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी असलेल्या लहान व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या वस्तूंसाठी पैसे देण्यासाठी अ‍ॅमेझॉन पे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या डिजिटल पेमेंट सिस्टमचा वापर करू शकता. यावर तुम्ही 10% पर्यंत कॅशबॅकदेखील मिळवू शकता.

कोरोना महामारीविरोधात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लहान व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने या व्यावसायिकांपुढे भीषण आर्थिक संकट उभे केले आहे. म्हणूनच अ‍ॅमेझॉन इंडियाचा लघु व्यवसाय दिवस 2021 हा छोट्या व्यावसायिकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न आहे. या व्यवसायिकांना मदत देणे हे ग्राहक म्हणून आपले कर्तव्य आहे. कारण या व्यावसायिकांची भरभराट झाल्यास देशभरातील कोट्यावधी ग्राहकांना त्यांची उत्पादने व सेवांचा फायदा होईल. (Amazon’s power to small businesses; Participate in Small Business Day)

इतर बातम्या

“सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याला 4 वर्ष पूर्ण, सरकार अंमलबजावणी कधी करणार?”

Ola इलेक्ट्रिक स्कूटर लाँचिंगसाठी सज्ज, व्हिडीओ शेअर करत CEO म्हणाले, नव्या क्रांतीसाठी तयार व्हा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.