अनिल अंबानींच्या ‘या’ तीन कंपन्यांमुळे गुंतवणुकदारांची चांदी; तीन महिन्यात 250% रिटर्न्स

Anil Ambani Reliance | अनिल धीरुभाई अंबानी (ADAG) ग्रुपमधील तीन कंपन्यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये शेअर बाजाराचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांचे भांडवली मूल्य 8000 कोटींपेक्षा म्हणजे जवळपास 10 टक्क्यांनी वाढले आहे

अनिल अंबानींच्या 'या' तीन कंपन्यांमुळे गुंतवणुकदारांची चांदी; तीन महिन्यात 250% रिटर्न्स
भांडवली बाजार
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jun 21, 2021 | 8:09 AM

मुंबई: एकीकडे कर्जाच्या ओझ्यामुळे आणि बँकांच्या कारवाईमुळे उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या चिंता वाढत असल्या तरी सध्याचा काळ त्यांच्यासाठी काहीप्रमाणात दिलासादायक आहे. कारण रिलायन्स समूहातील काही कंपन्यांनी शेअर बाजारात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. त्यामुळे गुंतवणुकदार रिलायन्स कंपनीच्या कामगिरीवर नजर ठेवून आहेत. (Anil Ambani led reliance group market cap rose 10 times in 3 months)

अनिल धीरुभाई अंबानी (ADAG) ग्रुपमधील तीन कंपन्यांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये शेअर बाजाराचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांचे भांडवली मूल्य 8000 कोटींपेक्षा म्हणजे जवळपास 10 टक्क्यांनी वाढले आहे. Reliance Power, Reliance Infrastructure, Reliance Capital या कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या 20 सत्रांमध्ये या तिन्ही कंपन्यांच्या 50 लाख समभागधारकांचा मोठा फायदा झाला आहे.

Reliance Power Share

या आठवड्यात बाजार बंद होताना रिलायन्स पॉवरचा शेअरचा भाव 15.85 रुपये इतका होता. ही 52 आठवड्यातील सर्वाधिक किंमत आहे. तर रिलायन्स पॉवरच्या शेअरचा 52 Week Low 2.40 रुपये इतका आहे. या कंपनीची मार्केट कॅप 4446 इतकी आहे. या समभागाने गुंतवणुकदारांना एका महिन्यात 26.80 टक्के, एका महिन्यात 130 टक्के आणि तीन महिन्यात 249 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

Reliance Infrastructure Share

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या समभागाची या आठवड्यात बाजार बंद होतानाची किंमत 105.20 रुपये इतकी होती. 105.90 रुपये हा या शेअरचा 52 Week High आहे, तर 52 Week Low 19.20 रुपये इतका आहे. या महिन्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरने 27 टक्के, गेल्या महिनाभरात 104 टक्के आणि गेल्या तीन महिन्यांत 225 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

Reliance Capital Share

अनिल अंबानी यांच्या समूहातील सर्वात महत्वाची कंपनी असलेल्या रिलायन्स कॅपिटलच्या समभागाची या आठवड्यात बाजार बंद होतानाची किंमत 25.85 रुपये इतकी होती. हा या शेअरचा 52 Week High आहे. तर 52 Week Low 7.10 रुपये इतका आहे. रिलायन्स कॅपिटलच्या समभागाने या महिन्यात गुंतवणुकदारांना 27 टक्के, गेल्या महिनाभरात 125 टक्के आणि तीन महिन्यात 131 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत.

इतर बातम्या:

अनिल अंबानींना मोठा दिलासा; ‘या’ कंपनीच्या विक्रीमुळे कर्जाचा बोझा कमी होणार

रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी होणार, रिलायन्स पॉवर 1325 कोटींचे शेअर्स, वॉरंट जारी करणार

शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई; अदानी ग्रूपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले

(Anil Ambani led reliance group market cap rose 10 times in 3 months)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें