Gold Akshaya Tritiya : सोने खरेदी करताना सावधान! फसवणुकीची नका होऊ शिकार

Gold Akshaya Tritiya : आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, नाहीतर दुकानदार तुम्हाला चूना लावल्याशिवाय राहणार नाही.

Gold Akshaya Tritiya : सोने खरेदी करताना सावधान! फसवणुकीची नका होऊ शिकार
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 10:19 AM

नवी दिल्ली : आज संपूर्ण देशात अक्षय तृतीयेची ( Akshaya Tritiya 2023) धामधूम आहे. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, आज सोने-चांदीची खरेदी शुभ मानण्यात येते. यामुळे घरात समृद्धी आणि सूख येत असल्याची मान्यता आहे. या दिवशी सर्वसामान्य सोने-चांदीची खरेदी करतात.आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, नाहीतर दुकानदार तुम्हाला चूना लावल्याशिवाय राहणार नाही. नकली सोने विक्रीची शक्यता ही नाकारता येत नाही. तसेच इतर धातूंचे मिश्रण असलेले सोने तुमच्या माथी मारण्यात येऊ शकते. त्यामुळे सोने खरेदी (Gold Buying Tips)करताना विशेष काळजी घ्या.

1. हॉलमार्क तपासा सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्हाला सोन्याचे शिक्के, दागिने, आभुषणे, बिस्किट, तुकडा कशाची खरेदी करायची ते अगोदर ठरवा. त्यावरील हॉलमार्क (Hallmark on Gold Jewellery) तपासा. केंद्र सरकारने 1 एप्रिल, 2023 रोजीपासून सर्व दागिन्यांवर 6 क्रमांकाच्या हॉलमार्क (Hallmarking Rules) असणे अनिवार्य केले आहे. कोणताही दुकानदार विना 6 क्रमांकाच्या हॉलमार्क शिवाय दागिन्यांची विक्री करु शकत नाही.

2. मेकिंग चार्ज चेक करा सोन्याचे दागिने खरेदी करताना मेकिंग चार्ज (Gold Jewellery Making Charge) तपासणे अत्यावशक आहे. प्रत्येक दुकान आणि ब्रँडचा मेकिंग चार्ज वेगवेगळे असतात. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार खास सवलत (Akshaya Tritiya Offers) पण जाहीर करतात. मेकिंग चार्जवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. हे भाव तपासून दागिने खरेदी केल्यास पैशांची बचत होईल.

हे सुद्धा वाचा

3. सोन्याचा भाव तपासा सोन्याचा भाव तपासताना सोन्याची किंमत काय आहे, हे जरुर तपासा. सोन्याचे भाव राज्य आणि शहरानुसार वेगवेगळे असतात. त्यात तफावत असते. त्यामुळे योग्य किंमतीचा अंदाज घेऊन सोने खरेदी करता येईल. तुम्ही शहरातील दुकानांचे टेलिफोन क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक मिळवून भावाचा अंदाज बांधू शकता. त्यामुळे दुकानात फिरण्याचा तुमचा वेळ वाचेल.

4. बिल तर आवश्यक आहे सोने खरेदी करताना बिल असणे आवश्यक आहे. पक्के बिल घ्यायचे की कच्चे बिल घ्यायचे हे दुकानाची विश्वसर्हता आणि तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. कर वाचविण्याच्या प्रकारात अनेकदा नंतर फसवणूक होते. त्यामुळे बिल घ्या आणि ते जपून ठेवा. त्यावर सोने-चांदीची शुद्धता, वजन आणि किंमत यांचा तपशील असतो.

5. वजन आवश्यक तपासा सोने खरेदी करताना त्याचे वजन आवश्य तपासा. तुम्ही किती कॅरेटचे सोने खरेदी केले हे जसे महत्वाचे आहे. तसेच ते किती ग्रॅम, तोळ्याचे आहे, हे पण चांगले तपासा. नाहीतर कमी वजनाचे सोने, जास्त किंमतीला माथी मारण्याचे प्रकार ही घडतात. एकादा बिल झाल्यावर मात्र दुकानदार तुम्हाला मदत करत नाहीत. त्यामुळे घाई घाईत सोने खरेदी करुच नका.

6. सोन्याची गुणवत्ता सोन्याची गुणवत्ता कॅरेटमध्ये मोजतात. कॅरेट हे परिमाण आहे. सोने जितके अधिक शुद्ध ते तेवढे सोप्यारित्या मोडले जाते. वितळते. सोन्याच्या धातू पासून अनेक दागिने, आभुषणे व इतर वस्तू तयार करण्यात येतात. सोन्याला विविध आकारात मोडता येते. सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना मजबूत करण्यासाठी यामध्ये इतर धातूंचे मिश्रण करतात. त्यामुळे सोन्यापासून तयार होणाऱ्या वस्तू सहजासहज तूटत नाहीत.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.