AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jobs : नोकरीच्या आघाडीवर आनंदवार्ता! 2022 मध्ये ब्लू कॉलर-ग्रे कॉलर नोकऱ्या वाढल्या

Jobs : मंदीचे सावट असतानाही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या वाढल्या आहेत.

Jobs : नोकरीच्या आघाडीवर आनंदवार्ता! 2022 मध्ये ब्लू कॉलर-ग्रे कॉलर नोकऱ्या वाढल्या
Jobs
| Updated on: Jan 11, 2023 | 5:37 PM
Share

नवी दिल्ली : भारतासह जगभरात मंदीचे सावट (Recession) आहे. टेक आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये (Startup Company) मोठ्या प्रमाणात कामगार कपात करण्यात आली आहे. पण काही क्षेत्र त्याला अपवाद आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या (Jobs) वाढल्या आहेत. ब्लू कॉलर (Blue Collar) आणि ग्रे कॉलर जॉब्सची (Gray Collar Jobs) संख्या जोरदार वाढली आहे. 2022 मध्ये या क्षेत्रात कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. कामगारांची संख्या चार पट वाढली आहे. क्वेस कॉर्पची उपकंपनी बिलियन करियर्सने याविषयीचा अहवाल दिला आहे.

ब्लू कॉलर आणि ग्रे कॉलर कंपन्यांनी गेल्या वर्षी सर्वाधिक नोकऱ्या दिल्या आहेत. या कंपन्यांमध्ये डिजिटायझेशन, ऑटोमेशन आणि न्यू वर्क मॉडलचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांमध्ये कुशल कामगारांची मागणी वाढली आहे.

अहवालानुसार, 2021 मध्ये ब्लू आणि ग्रे कॉलरसाठी 26,26,637 इतक्या कर्मचारी, कामगारांची आवश्यकता होती. तर 2022 मध्ये ही संख्या वाढली. गेल्या वर्षी 1,05,42,820 इतक्या कुशल मनुष्यबळाची गरज पडली. म्हणजे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची मागणी वाढली आहे.

डाटानुसार, ब्लू आणि ग्रे या सेक्टरमध्ये नोकरी शोधणाऱ्यांची संख्या ही वाढली. 236 टक्क्यांनी ही संख्या वाढली आहे. या क्षेत्रातील कंपन्यांनी कुशल कामगाऱ्यांना नोकरी देण्यावर भर दिला आहे. कंपन्यांचे उत्पादन आणि क्षमता वाढीसाठी कुशल कामगारांच्या भरतीवर भर देण्यात येत आहे.

अहवालात भारतातील कोणत्या शहरात ब्लू कॉलर आणि ग्रे कॉलर वर्कर्सची मागणी वाढली आहे. त्याची माहिती देण्यात आली आहे. भारतातील प्रमुख महानगरातील आकडेवारी या अहवालात देण्यात आली आहे.  त्यात या दोन्ही सेगमेंटमधील नोकऱ्या वाढल्याचे दिसते.

ब्लू कॉलर आणि ग्रे कॉलर कामगाऱ्यांच्या संख्येत 11.57 टक्क्यांची वाढ झाली आहे. बेंगळुरुमध्ये 11.55 टक्के, मुंबईत या सेगमेंटमध्ये 10.21 टक्के कामगारांची मागणी वाढली आहे. हैदाराबादमध्ये 7.78 टक्के तर पुण्यात कुशल कामगारांच्या मागणीत 5.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Blue Collar Worker हे कुशल कामगार असतात. उत्पादन, वेअर हाऊस, खाणकाम या सारख्या क्षेत्रात या कामगारांची आवश्यकता असते. तर Grey Collar Worker हे शक्यतोवर सेवानिवृत्त कर्मचारी असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा कंपन्यांना होतो. विविध पदावर हे लोक काम करतात.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.