ट्रान्सजेंडर्सना खरोखरच मासिक पाळी येते का? काय आहे सत्य?
मासिक पाळीबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात. त्यातील एक गैरसमजमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींना मासिक पाळी येते का? चला जाणून घेऊयात.

मासिक पाळी ही महिलांच्या शरीरात एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये दर महिन्याला स्त्रीच्या गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) रक्त आणि ऊतींच्या स्वरूपात योनीतून बाहेर पडते. बहुतेक मुलींना 12 ते 15 वयोगटात मासिक पाळी सुरू होते. असे असूनही, मासिक पाळीशी संबंधित अनेक प्रश्न आजही उपस्थित केले जातात.
आपण मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल किंवा आहाराबद्दल देखील अनेकदा बोललं गेलं आहे. पण मासिक पाळीबाबत एक प्रश्न असाही आहे ज्याबद्दल अनेकांना आजही संभ्रम आहे. तो प्रश्न म्हणजे ट्रान्सजेंडर महिलांनाही सामान्य मुलींप्रमाणे मासिक पाळी येते का? ट्रान्सजेंडर हे पूर्णत: स्वत:ला मुलगीच समजत असतात. त्यांचे शरीर जरी पुरुषाचे असले तरी देखील ते स्वत:मध्ये एक मुलगीच शोधत असतात.
मासिक पाळीबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज
मासिक पाळीबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जेव्हा आपण ट्रान्सजेंडर महिलेबद्दल बोलतो तेव्हा हे गैरसमज आणखी वाढतात. अनेकदा लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की जर ट्रान्सजेंडर महिलेची शरीररचना पूर्णपणे मुलीसारखी झाली तर त्यांनाही सामान्य मुलींप्रमाणे मासिक पाळी येऊ लागते का? तर याचं उत्तर आहे नाही. ट्रान्सजेंडर्सना मासिक पाळी येत नाही. याचा खुलासा स्वत: एक प्रसिद्ध ट्रान्सजेंडरनेच केला आहे.
अलिकडेच मुलापासून मुलगी झालेल्या अनया बांगरने या प्रश्नाचे मोकळेपणाने उत्तर दिले आहे.
हा गोंधळ दूर केला आहे क्रिकेटपटू संजय बरंगने जो स्वत: मुलापासून मुलगी बनला. आणि आता ती अनया बांगर नावाने ओळखली जाते. अनया बांगरने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. अलिकडेच मुलापासून मुलगी झालेल्या अनया बांगरने या प्रश्नाचे मोकळेपणाने उत्तर दिले आहे.
ट्रान्सजेंडरनाही मासिक पाळी येते का?
‘ट्रान्सजेंडर्सना मासिक पाळी येते का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना अनाया म्हणाली की, ट्रान्सजेंडर्सना मासिक पाळी येत नाही. कारण ट्रान्सजेंडर महिलांची शरीर रचना आणि जैविक प्रक्रिया जन्मापासूनच स्त्री शरीरापेक्षा वेगळी असते. त्यांना अंडाशय किंवा गर्भाशय नसते. त्यामुळे त्यांना मासिक पाळी येत नाही. अनायाने असेही म्हटले आहे की, बरेच लोक ट्रान्सजेंडर्सना स्त्रीसारख्या सर्व शारीरिक प्रक्रियांशी जोडतात, तर सत्य यापेक्षा बरंच वेगळं आहे.
View this post on Instagram
मूड स्विंग होतात, मासिक पाळी नाही
अनया म्हणाली, जरी ट्रान्सजेंडर्सना मासिक पाळी येत नसली तरी, त्यांना महिलांप्रमाणेच मूड स्विंगचा अनुभव निश्चितच वेगळ्या पद्धतीने येतो. समाजात ट्रान्सजेंडर्सबद्दल संवेदनशीलता आणि समज वाढावी म्हणून अशा प्रश्नांवर मोकळेपणाने बोलणे महत्त्वाचे आहे असे अनया मानते.
ट्रान्सजेंडर पुरुषांना मासिक पाळी येते का?
ट्रान्सजेंडर पुरुष म्हणजे जे जन्माला येतात मुलगी म्हणून पण नंतर ते स्वतःला पुरुष म्हणून समजू लागतात. तर काहीजण स्वत:मध्ये पुरुषांसारखेच बदल करून घेतात. पण जन्मत:च ती मुलगी असल्याने त्यांच्यात गर्भाशय आणि अंडाशय असतंचं त्यामुळे त्यांना मासिक पाळी येऊ शकते. काही ट्रान्सजेंडर पुरुष मासिक पाळी थांबवण्यासाठी हार्मोन थेरपीही घेतात. ज्यामुळे त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते आणि मासिक पाळी थांबवता येते.
