AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुकर तयार करणाऱ्या कंपनीची फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, तीन वर्षांच्या ठेवीवर 8 टक्के व्याज

Fixed Deposit | कंपनीने व्याज मिळवण्यासाठी दोन पर्यायही दिले आहेत. आपली इच्छा असल्यास, आपण दर सहामाही किंवा योजनेच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर ते घेऊ शकता. म्हणजेच, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पूर्ण व्याज जोडू शकता

कुकर तयार करणाऱ्या कंपनीची फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, तीन वर्षांच्या ठेवीवर 8 टक्के व्याज
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Sep 17, 2021 | 12:04 PM
Share

नवी दिल्ली: प्रेशर कुकरच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉकिन्स कुकर्स या कंपनीने आता गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवण्याची संधी दिली आहे. हॉकिंग कुकर्सने या एफडी योजनेच्या अर्जासाठी पूर्व नोंदणी सुरू केली आहे. या एफडी योजनेवर, हॉकिन्स एका वर्षासाठी 7.5%, दोन वर्षांसाठी 7.75% आणि तीन वर्षांच्या गुंतवणूकीसाठी 8 पैसे देतील. हॉकिन्स कुकर्स FD ला रेटिंग एजन्सी ICRA द्वारे MAA अर्थात स्टेबल रेटिंग देण्यात आले आहे.

2019 मध्ये कंपनीकडे सुमारे 22 कोटी रुपये मूल्याच्या मुदतठेवी होत्या. या वर्षी 29 जुलैपर्यंत ते वाढून 34 कोटी रुपये झाले. हॉकिन्स कुकर्स लिमिटेडने FD साठी पूर्व नोंदणी सुरू केली आहे. FD साठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक गुंतवणूकदारांनी www.hawkinscookers.com/fd2021.aspx ला भेट द्यावी.

व्याजाचे दोन पर्याय

कंपनीने व्याज मिळवण्यासाठी दोन पर्यायही दिले आहेत. आपली इच्छा असल्यास, आपण दर सहामाही किंवा योजनेच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर ते घेऊ शकता. म्हणजेच, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पूर्ण व्याज जोडू शकता आणि FD च्या मॅच्युरिटीनंतर ते घेऊ शकता. जर तुम्ही शेवटी व्याज घेतले तर तुम्हाला फायदा होईल की तुमचे व्याज देखील वाढेल. अशा प्रकारे, तुम्ही तीन वर्षांच्या FD वर 8.3 टक्के परतावा मिळवू शकता.

हे बाजारात दीर्घकाळ टिकणारे उत्पादन मानले जाते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बहुतेक बँका तीन वर्षांपर्यंतच्या FD वर फक्त 5 ते 6 टक्के व्याज देत आहेत. अशा परिस्थितीत हॉकिन्सची ही एफडी योजना अतिशय आकर्षक मानली जाते. कंपनीचा व्यवसाय चांगला आहे आणि कोरोना संकटकाळातही कंपनीने 80.64 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा फक्त 54.22 कोटी रुपये होता.

किंचीत जोखीम पण जास्त परतावा

बँकातील सुरक्षित मुदत ठेव गुंतवणुकीच्या तुलनेत कॉर्पोरेट FD मध्ये थोडीशी जोखीम असते. बँक बुडली तर सरकार त्यांच्या एफडीवर जास्तीत जास्त 5 लाख रुपये परत करण्याची हमी देते. पण कॉर्पोरेट एफडीच्या बाबतीत असे नाही. त्यामुळे अशी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी, तुम्ही आर्थिक सल्लागाराचे मत घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

LIC ची भन्नाट योजना, 200 रुपयांची गुंतवणूक करा आणि 17 लाख रुपये मिळवा

दिवसाला केवळ 63 रुपये भरा आणि 7 लाख मिळवा, LIC ची खास योजना नेमकी काय?

LIC ची जीवन अमर पॉलिसी, फीचर्स चेक करा, तुमच्यासाठी किती फायदेशीर?

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!