AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Helpline: रेल्वेत तुमची बर्थ कोणी बळकवली तर फक्त असा एक मेसज करा, तुमचा प्रश्न जागेवरच सुटेल

Railway Helpline: रेल्वेचा 139 क्रमांकावर एक मेसेज पाठवून तक्रार करु शकता. त्यानंतर टीसीला तुम्हाला शोधावे लागणार नाही. टीसी तुम्हाला शोधत तुमच्या बर्थवर येईल. त्यासाठी तुमचा पीएनआर नंबर, सीट नंबर आणि विषय असे टाईप करुन मेसेज 139 क्रमांकावर पाठवा.

Railway Helpline: रेल्वेत तुमची बर्थ कोणी बळकवली तर फक्त असा एक मेसज करा, तुमचा प्रश्न जागेवरच सुटेल
| Updated on: Oct 16, 2024 | 6:56 AM
Share

Railway Helpline: भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. रेल्वेचा प्रवास सर्वात सुरक्षित आणि आरामदायक असतो. त्यामुळे अनेक जण प्रवास करण्यासाठी आरक्षण करुन प्रवास करतात. परंतु काही वेळा आरक्षित असलेल्या तुमच्या सीटवर दुसरा कोणीतरी बसलेला असतो. त्या व्यक्तीला सांगूनही तो जागेवरुन उठत नाही. त्यावेळी भांडण होते. मग तो व्यक्ती ऐकत नसेल तर एक पर्याय आहे. त्याच्याशी भांडण करण्यापेक्षा एक मेसज करा. तुमचा प्रश्न जागेवर सुटेल. तुम्हाला तुमच्या हक्काची बर्थ मिळेल.

काय आहे पर्याय

तुमच्या आरक्षित सीटवर कोणी बसला असेल तर पहिला पर्याय आहे. तुम्ही त्याची टीसीकडे तक्रार करा. परंतु एका टीसीकडे अनेक कोच असतात. त्यामुळे टीसी मिळत नाही. त्यामुळे रेल्वेने आणखी एक पर्याय दिला आहे. तुम्ही रेल्वेचा 139 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. किंवा रेल्वेची अधिकृत वेबसाईट https://railmadad.indianrailways.gov.in/madad वर तक्रार करा.

रेल्वेने आणखी एक पर्याय दिला आहे. तुम्ही रेल्वेचा 139 क्रमांकावर एक मेसेज पाठवून तक्रार करु शकता. त्यानंतर टीसीला तुम्हाला शोधावे लागणार नाही. टीसी तुम्हाला शोधत तुमच्या बर्थवर येईल. त्यासाठी तुमचा पीएनआर नंबर, सीट नंबर आणि विषय असे टाईप करुन मेसेज 139 क्रमांकावर पाठवा. म्हणजे SEAT (PNR NUMBER) (SEAT NUMBER) OCCUPIED BY UNKOWN PASSENGER हा मेसेज पाठवा. तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाते.

इतर कोणत्याही अडचणीसाठी…

रेल्वेने इतर अडचणींसाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी 58888 आणि 9200003232 या क्रमांकावर मेसेज पाठवावे लागले. तुमचा कोच खराब असले, पाणी नसेल किंवा इतर काही अडचण असल्यास आपला पीएनआर नंबर आणि मोबाईल नंबर टाकून जी सर्व्हिस हवी त्याचा मेसज टाका.

  • C – कोचच्या स्वच्छतेसाठी
  • W – पाण्यासाठी
  • P – निर्जंतुकीकरण आणि कीटक नियंत्रणासाठी
  • B – बेडरोलसाठी
  • E – ट्रेन लाइट आणि एसी साठी
  • R -किरकोळ दुरुस्तीसाठी
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.