सणासुदीच्या काळात सोन्याचा भाव वधारला, राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold price | मुंबईत दिवाळीपासून म्हणजे 5 नोव्हेंबरपासून स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारीही सोन्याच्या प्रतितोळा दरात 370 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याच्या खरेदीसाठी जवळपास 50,370 रुपये मोजावे लागत आहेत. तर चांदीचा प्रतिकिलो दर 68530 रुपये इतका आहे.

सणासुदीच्या काळात सोन्याचा भाव वधारला, राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
सोने खरेदी

मुंबई: दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या भावात पुन्हा उसळी पाहायला मिळेल, हा जाणकारांचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजपेक्षा स्थानिक बाजारपेठांमध्ये प्रत्यक्ष सोन्याचे दागिने खरेदी करताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. सोन्याच्या प्रतितोळा दरात जीएसटी आणि घडणावळीची भर पडत असल्याने ग्राहकांचा खिसा रिता होत आहे.

मुंबईत दिवाळीपासून म्हणजे 5 नोव्हेंबरपासून स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारीही सोन्याच्या प्रतितोळा दरात 370 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याच्या खरेदीसाठी जवळपास 50,370 रुपये मोजावे लागत आहेत. तर चांदीचा प्रतिकिलो दर 68530 रुपये इतका आहे.

तर पुण्यात गेल्या आठडाभरात सोन्याच्या दरात जवळपास 1600 रुपयांनी वाढ झाली आहे. पुण्यातील सराफ बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर 50370 रुपये इतका नोंदवण्यात आला.

नागपुरातही सोन्या-चांदीच्या भावात वाढ होताना दिसत आहे. आज नागपुरात सोने 50,370 रुपये प्रतितोळा आहे. काल हेच भाव 50 हजार रुपये प्रतितोळा होते. चांदीचे भाव आज 58 हजार 530 रुपये आहे, तर काल 67 हजार 600 रुपये होते. जळगाव आणि नाशिकमध्येही सोन्याचा प्रतितोळा दर 50,370 रुपये इतका आहे. तर औरंगाबादमध्ये 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 50,340 रुपये मोजावे लागत आहेत.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी, चांदीचे भाव 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरून 49,091 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. दुसरीकडे आजच्या व्यवहारात चांदी 0.21 टक्क्यांनी घसरली. सध्या चांदीचा प्रतिकिलो भाव 66,825 रुपये इतका आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर

तुम्ही दररोज घरबसल्या सोन्याचा भाव जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक संदेश येईल, ज्यामध्ये तुम्ही सोने आणि चांदीचे नवे दर पाहू शकता.

रेकॉर्ड स्तरापेक्षा 7100 रुपयांनी स्वस्त

2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज, MCX वर सोने डिसेंबर फ्युचर्स 49,091 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच सोने अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा 7109 रुपयांनी स्वस्त आहे.

इतर बातम्या:

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना

Solar Energy: घरावर सोलर पॅनल्स लावायचेत, जाणून घ्या किती खर्च येणार?

आता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च

Published On - 1:51 pm, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI