Bank Locker : बँकेच्या लॉकरमधूनच झाली चोरी, मग सांगा नुकसान बँकेचे की तुमचे?

Bank Locker : बँकेतील लॉकरमधील तुमची मौल्यवान वस्तू, कागदपत्रे चोरीला गेले तर...जबाबदारी बँकेची असते की नाही? काय सांगतो नवीन नियम...

Bank Locker : बँकेच्या लॉकरमधूनच झाली चोरी, मग सांगा नुकसान बँकेचे की तुमचे?
बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमधून महिलेचे दागिने लंपास
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 9:04 PM

नवी दिल्ली : देशात अशी काही उदाहरणे समोर आली आहेत की, बँक लॉकरमधील (Bank Locker Rules) मौल्यवान वस्तू, कागदपत्रे चोरीला गेले आहेत. मग अशावेळी बँकेवर किती जबाबदारी आहे, हा प्रश्न ऐरणीवर आला. काही बँकांनी तर सरळ सरळ हात वर केले. त्यामुळे लॉकरची व्यवस्था धोक्यात आली. याविषयी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे तक्रारींचा पाऊस पडला. आरबीआयला तिची भूमिका जाहीर करणे भाग पडले. बँकांच्या ‘चित भी मेरी पट भी मेरी’ या धोरणावर आरबीआयला भूमिका घेणे भाग पडले. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक लॉकरसंबंधीच्या नियमात (New Rules for Bank Locker) बदल केला आहे. नियमानुसार आता ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. तर बँकांच्या मनमानीला चाप बसणार आहे.

काय आहे नवीन नियम नवीन वर्षात 1 जानेवारी 2023 रोजीपासून बँक लॉकरसंबंधीनियम बदलणार आहे. तुमचा किंमती ऐवज, आभुषण, महत्वाची कागदपत्रे बँकेतील लॉकरमध्ये ठेवतात. त्यांच्यासाठी हा नियम आणण्यात आला. RBI च्या या नवीन नियमानुसार, जर लॉकरमधील सामान गायब झाले. त्याचे नुकसान झाले. तर आता बँकेवर जबाबदारी निश्चित होईल. या नियमामध्ये लॉकरसंबंधीची सर्व माहिती देण्यात येईल. त्यामुळे ग्राहक त्याच्या सामानाविषयी सतत अपडेट राहील.

तर बँकेवर जबाबदारी RBI च्या नियमानुसार, अगर बँकेच्या हलगर्जीपणामुळे लॉकरमधील सामान गायब झाले. त्याचे नुकसान झाले तर त्याची बँकेवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यासंबंधीची शंभर पट नुकसान भरपाई बँकेला मोजावी लागणार आहे. त्यामुळे बँकेला आता लॉकरची सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्थापन करावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

इतक्या पट नुकसान भरपाई कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे, हलगर्जीपणामुळे लॉकरमधील सामानाचे नुकसान झाले तर त्याचा फटका बँकेला सहन करावा लागणार आहे. बँकेला वार्षिक भाड्याच्या 100 पट नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यामुळे बँकांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.

नियमात अशी आहे शिथिलता पण या नियमात एक शिथिलता आहे. भुकंप, जोरदार पाऊस, महापूर, नैसर्गिक आपत्ती अथवा ग्राहकाच्या हलगर्जीपणात बँकेला नुकसान भरपाई देण्याची गरज पडमार नाही. बँकेला त्यासाठी दोषी ठरवता येणार नाही.

बँकांना मोठा फायदा गेल्या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा 59 टक्क्यांनी वाढून 50,232 कोटी रुपये झाला. तर सर्वांना चकित करत बँक ऑफ महाराष्ट्राने मोठी झेप घेतली. ही बँक जोरदार फायद्यात आली. महाबँकेने 126 टक्क्यांचा नफा कमविला. या बँकेने 2,602 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर युको बँकेचा क्रमांक आहे. या बँकेने 100 टक्के नफा कमवित 1,862 कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोद्याने 94 टक्के तेजीसह 14,110 कोटी रुपयांचा नफा मिळविला.

Non Stop LIVE Update
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....