सोनं किंवा रिअल इस्टेट : जाणून घ्या कुठे गुंतवायचे पैसे..!

सोनं किंवा रिअल इस्टेट : जाणून घ्या कुठे गुंतवायचे पैसे..!
आजचे सोन्या-चांदीचे भाव
Image Credit source: TV9 Marathi

गुंतवणुकीसाठी आज अनेक पर्याय आहेत.योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याला कमी वेळात चांगला परतावा मिळू शकतो.सोन्यातील की स्थावर मालमत्ता यापैकी कोणती गुंतवणूक चांगली ते पाहू.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Mar 25, 2022 | 12:46 PM

मुंबई : सध्या भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने अनेक जण गुंतवणूक करतात. तसे आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय (Investment Options) उपलब्ध आहेत. योग्य पर्याय निवडल्यास तुम्ही गुंतवणुकीवर चांगला परतावा (Good Returns) मिळवू शकता. जर गुंतवणूकदाराने योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याला कमी वेळात चांगला परतावा मिळू शकतो. पण अनेकदा गुंतवणूक करताना जोखीम आणि धोके (Risks) पण लक्षात ठेवावे लागतात. अन्यथा पै पै करून साठवलेले पैसा क्षणात हातचा निघून जातो. गुंतवणूक करताना तुमचं उद्दिष्ट निश्चित हवे. कोणत्या कारणासाठी तुम्ही गुंतवणूक करता आणि यातून भविष्यात तुम्हाला काय साध्य करता येईल याची सांगड घालता यायला हवी. गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं आणि स्थावर मालमत्ता याकडे सर्वसामान्यांचा मोठा कल असतो. यापैकी कोणता पर्याय फायद्याचा राहिल ते बघुयात.

सोन्यात गुंतवणूक एक चांगला पर्याय

सोन्यातील गुंतवणूक हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. भारतीय या पिवळ्या रंगाच्या धातुच्या विशेष प्रेमात आहेत. सोन्यातील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. सोन्यात गुंतवणूक केल्यास भरपूर चांगला परतावा मिळतो. गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा सोने अनेक बाबतीत वेगळे आहे. भारतीय जनतेसाठी सोन्याच्या भावना मूल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोने ही एक अशी गुंतवणूक आहे जी आपल्याला संरक्षण देते. लग्नात वडील ते आपल्या मुलीला भेट म्हणून देतात..मग, ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहते. याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या गरजेनुसार खरेदी करता येते. सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही छोट्या रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत वापरू शकता. सोनं हे एक प्रकारचे खेळते भांडवल आहे. याचा अर्थ गरज पडल्यास त्याची विक्री करून तुम्हाला पैसे गाठीशी बांधता येतात. अडचणीच्या वेळी याचा खूप उपयोग होतो. आता गोल्ड लोन कंपन्याही सोन्यावर कर्ज देत आहेत. तुम्ही तुमचे सोने कंपनीकडे गहाण ठेवून कर्ज घ्या. कर्जाचे पैसे फेडल्यानंतर तुमचे सोने परत घ्या. कर्जाच्या काळात व्याज तेवढं तुम्हाला फेडावं लागतं.

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर

रिअल इस्टेट हेदेखील गुंतवणुकीचे जुने साधन आहे. जर तुम्ही विचारपूर्वक प्रॉपर्टी निवडली असेल, तर ती तुम्हाला काही वर्षांत अनेक पटींनी परतावा देऊ शकते. रिअल इस्टेटचा परतावा सोन्यापेक्षा जास्त राहतो. परंतु, मालमत्तेच्या ठिकाणावर ते अवलंबून असते. धोका कमी आहे. सोन्याप्रमाणे त्याचे दरही दररोज वाढत नाहीत. रिअल इस्टेट हा स्थिर गुंतवणुकीचा पर्याय आहे, जिथे जोखीम कमी आहे.

सोने आणि रिअल इस्टेटमधील फरक

• सोने आणि रिअल इस्टेटमधील एक मोठा फरक म्हणजे स्थावर मालमत्तेचा आपण वापर करु शकतो.

• सोने लॉकरमध्ये बंदिस्त राहते, तर स्थावर मालमत्तेचा वापर तुम्ही स्वत: ला राहण्यासाठी आणि भाडे वसूल करु शकतो. तसेच मालमत्तेचे मूल्य ही वाढते. त्यामुळे सध्या स्थावर मालमत्तेत गुंतवणूक वाढली आहे.

संबंधित बातम्या :

लग्नाला न लागो दृष्ट; करा विम्याचं औक्षण! विवाह विम्यामुळे नुकसानीपासून व्हा तणावमुक्त!

Gold, silver prices : सोन्याच्या दरात आज पुन्हा तेजी, जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्या, चांदीचे भाव

Post Office Small Savings Scheme : नो रिस्क, कमाई फिक्स दहा वर्षात या योजनेत पैसे होतील दुप्पट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें