Gold price: सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold price | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याची किंमत गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे.

Gold price: सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव
सोन्याचा दर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Oct 06, 2021 | 11:24 AM

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याची किंमत गेल्या अनेक महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटच्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 45,680 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 46680 रुपये प्रतितोळा आहे. मंगळवारी ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा दर सध्या प्रतितोळा 46797 रुपये इतका होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 44,940 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48,180 रुपये असेल. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45680 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46680 रुपये प्रतितोळा इतका आहे.

सणासुदीपूर्वी सोनं खरेदी करण्याचा सल्ला

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डॉलर आणि बॉण्ड्सवरील व्याज वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव आहे. आगामी काळातही हा दबाव कायम राहील. मात्र, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जगातील महागाईचा दर (Inflation Rate) वाढेल. अशा स्थितीत सोन्याची मागणी पुन्हा वाढेल आणि किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सोन्याचे भाव वाढण्याचा ट्रेंड पुन्हा सुरू होऊ शकतो. सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणीही वाढेल आणि किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सध्याचा काळ अत्यंत योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आणखी काही काळ भाव कमी राहण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीवर अजूनही दबाव आहे. जोपर्यंत ते $ 1750 च्या पातळीवर राहील तोपर्यंत हा दबाव कायम राहील. $ 1680 वर सोन्याच्या किंमतील भक्कम सपोर्ट आहे. गंगानगर कमोडिटी लिमिटेडचे ​​अमित खरे म्हणाले की, चीनमधील वीज संकटामुळे बाजारावर दबाव आहे. जर हे जास्त काळ चालले, तर शेअर बाजारातील गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित होतील. कारण कच्च्या तेलाच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे.

दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर

सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो.

पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

Income Tax: तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई

घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे योजना?

आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें