Jio vs Airtel vs vi: तुमच्या भागात कुठलं नेटवर्क चांगलं आहे असं तपासा
तुम्हाला देखील मोबाईल नेटवर्कची समस्या सतावत असेल तर तुम्ही तुमच्या भागात कोणते चांगले नेटवर्क आहे ते तपासून नवीन सिम किंवा मग त्या कंपनीत पोर्ट करु शकतात. यासाठी तुम्हाला खूप काही करण्याची गरज नाहीये, तुम्ही सहज ती गोष्ट तपासू शकतात. कसे ते जाणून घ्या सविस्तर.
अलीकडच्या काळात जिओमुळे अनेक कंपन्यांना टाळं लागलं आहे. जिओ लॉन्च होताच अनेक कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. ज्यानंतर त्यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारतात BSNL, Jio, Airtel आणि Vodafone-Idea या चार कंपन्या आहेत. ज्या सेवा पुरवत आहेत. पण नुकताच सर्व कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. देशभरातील मोबाईल युजर्सना खराब नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. कॉल ड्रॉप होणे, इंटरनेट स्लो चालणे आणि मोबाईल सिग्नल नसल्यामुळे कॉल न लागणे अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा इंटरनेट सेवा ठप्प देखील होते. त्यामुळे युजर्सना मोठा मनस्ताप होतो. मासिक रिचार्ज योजनेचे पैसे वाया जातात.
नेटवर्कची मोठी समस्या
मात्र आता ही समस्या टाळता येणार आहे. यासाठी तुम्हाला अधिक काही करण्याची गरज नाहीये. विशेषत: तुम्हाला त्या टेलिकॉम ऑपरेटरचे सिम घ्यावे ज्याचं नेटवर्क तुमच्या भागात जास्त आहे. समजा, जर तुम्ही Jio किंवा BSNL सिम घेतले असेल आणि तुमच्या भागात Airtel किंवा Vodafone नेटवर्क उपलब्ध असेल, तर तुमचे इंटरनेट नीट काम करणार नाही. कॉलिंग आणि मेसेजिंगमध्येही समस्या येते. अशा परिस्थितीत, सिम खरेदी करण्यापूर्वी तुम्ही ऑनलाइन हे तपासू शकतात की, तुमच्या भागात कोणते मोबाइल नेटवर्क सर्वोत्तम आहे.
कोणतं आहे App
Jio, Airtel, Vodafone-Idea सिम कार्ड युजर्स nperf आणि ओपन सिग्नलच्या मदतीने ऑनलाइन मोबाईल नेटवर्क शोधू शकतात. यानंतर, तुम्ही ज्या कंपनीचे नेटवर्क तुमच्या भागात आहे ते पाहू शकतात. ओपन सिग्नल हे एक मोबाईल ॲप आहे. याच्या माध्यमातून तुम्हाला ते कळू शकते. त्यानुसार मग तुम्ही त्या कंपनीचे सिम कार्ड खरेदी करा. Nperf ही एक वेबसाइट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही 2G, 3G, 4G आणि 5G नेटवर्क शोधू शकता. ओपन सिग्नल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल युजरसाठी ते उपलब्ध आहे.